आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Omkar Das Manikpur Will Fight Loksabha In Durg Seat

\'पीपली लाइव्ह\'चा हिरो नत्था देणार भाजप महिला उपाध्यक्ष सरोज पांडे यांना टक्कर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - सरकारी योजना आणि भ्रष्ट प्रशासनाचा बुरखा फाडणारा व माध्यमांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणून 'पीपली लाइव्ह' सर्वांना आठवत असेल. या चित्रपटाचा नायक ओंकारदास माणिकपुरी अर्थात नत्था आता राजकीय पटलावर झळकणार आहे. मुळचा छत्तीसगडचा रहिवासी असलेल्या नत्थाने लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. जर, सगळकाही त्याच्या मनाप्रमाणे घडले तर 'झाडू' हातात घेऊन मत मागणारा नत्था दिसला तर नवल वाटायला नको. छत्तीसगडच्या दुर्ग लोकसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढण्याची शक्यता आहे. येथून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सरोज पांडे खासदार आहे. यंदाही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 'महंगाई डायन खाए जात है...' सारखी गाणी गाऊन चित्रपट यशस्वी केलेला हिरो वास्तव जीवनात कोणती गाणी म्हणतो आणि कशी टक्कर देतो हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
आप छत्तीसगडमध्ये
छत्तीसगडमधील नक्षल प्रभावीत बस्तरमधून आम आदमी पार्टीने सोनी सोरी यांचे नाव आधीच घोषीत केले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. आप लवकरच रायपूर, दुर्ग आणि कांकेर येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे. यातील अनेक नावे आश्चर्यचकित करणारी राहातील असा, आपचा दावा आहे. दुर्ग मधून 'पीपली लाइव्ह'चा नायक ओंकारदास माणिकपुरी अर्थात 'नत्था'चे नाव चर्चेत आहे.