आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी जात हिंदू आणि मुस्लिमही; सलमानने कोर्टात सांगितले, वडील मुस्लिम, अाई हिंदू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानने बुधवारी जोधपूर न्यायालयात जबाब नोंदवला. ‘तुमची जात कोणती?’ अशी विचारणा कोर्टाने केल्यावर सलमानने इंग्रजीत ‘हिंदू अँड मुस्लिम बोथ. माय फादर इज मुस्लिम अँड मदर इज हिंदू,’ असे उत्तर दिले.
सलमानने शिकार व अवैध हत्यार बाळगल्याच्या आरोपासह सर्व आरोप नाकारले. पोलिस व वन विभागाने आपल्याला फसवले, असा आरोप त्याने केला. सलमानने पुरावे, साक्षीदार व दस्तऐवज सादर करण्याचा दावाही केला. पुढील सुनावणी ४ मे रोजी होईल. सलमानला २३ एप्रिलला काेर्टात हजर व्हायचे होते, पण त्याच्याऐवजी त्याची बहीण अलवीरा आली होती. सलमानची तब्येत ठीक नसल्याने तो न्यायालयात येऊ शकला नाही, असे तिने सांगितले होते.