आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकाने तुरुंगातून सुटलेल्या लालूंचे पाय धुतले, चहुबाजूने झाली टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : मदिराच्या बाहेर लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पाय धुतानी पो‍लिस अधीक्षक अशोक शर्मा. - Divya Marathi
फाईल फोटो : मदिराच्या बाहेर लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पाय धुतानी पो‍लिस अधीक्षक अशोक शर्मा.
पाटणा - बिहार निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. divyamarathi.com 'बिहार फ्लॅशबॅक' सीरिजनुसार तुम्हाला बिहारमधील प्रमुख घटनाक्रम सांगणार आहे. आज त्या अंतर्गत सांगत आहोत चारा घोटाळ्यात शिक्षा भोगलेले लालूप्रसाद यादव जेव्हा झारखंडाच्या बिरसामुंडा तुरुंगातून सुटून मंदिरात पोहोचतात त्यावेळी त्यांचे पाय एका पोलिस अधीक्षकाने धुतले होते. जशी याची बातमी आली तशी चहुबाजूने टीका झाली.

चारा घोटाळ्यातील आरोपी आणि राष्‍ट्रीय जनता दलाचे अध्‍यक्ष लालूप्रसाद यादव झारखंडमधील तुरुंगातून सुटल्यानंतर मॉं छिन्न मस्तिकाचे दर्शनाला आले होते. हे म‍ंदिर झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील रजप्पा भागात होते. येथे यादव यांचे पाय अशोक कुमार शर्मा या पोलिस अधिका-याने धुतले होते. यावेळी लालूप्रसाद यांचा मुलगा तेजस्वीही उपस्थित होता. लालू जेव्हा मंदिरात गेले तेव्हा त्यांची चप्पल सुरक्षा गार्ड हातात घेऊन बाहेर उभा होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी फोटोज...