आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचे आरोपी आसाराम- \'सलमानला जामीन मिळाला आता मलाही मिळणार\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयिन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम यांना सलमानाच्या जामीनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी त्यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा कोर्टात आणले गेले तेव्हा ते खूष दिसत होते. कोर्टाबाहेर आल्याबरोबर त्यांनी माध्यमांना सांगितले, की सलमानला जामीन मिळाला आता माझीही सुटका होईल.
सुनावणी टळली
लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेल्या आसाराम यांच्या प्रकरणाची सेशन्स कोर्टात सुनावणी सुरु आहे, मात्र गुरुवारी सुनावणी झाली नाही. या प्रकरणातील एक सब-इन्स्पेक्टरचा पुन्हा जबाब नोंदवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आसाराम यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यामुळे आज सेशन्स कोर्टातील सुनावणी स्थगित करण्यात आली.
समर्थकांना भेटले आसाराम
कोर्टाबाहेर आल्यानंतर आसाराम यांनी समर्थकांच्या अभिवादनाचा स्विकार केला. ते म्हणाले, माझ्या नावाने कोणीही पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. जर कोणी तसे करत असेल तर त्याची पोलिसात तक्रार करा. आज आसाराम यांना पाहाण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थक आले होते. त्यांना आसाराम यांना भेटण्याची इच्छा होती, मात्र पोलिसांनी त्यांना कोर्टापासून बरेच लांब उभे केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे पिटाळले आसाराम भक्त आणि त्यांची विनंती