आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार सरकारला कॉंग्रेसचा टेकू; ठरावाच्या बाजूने 126 मते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - एनडीएपासून काडीमोड घेतलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार कॉंग्रेसच्या मदतीने काठावर उत्तीर्ण झाले आहेत. अर्थात त्यांना विधानसभेत मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावात यश मिळाले आहे. कॉंग्रेसने विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने नितीशकुमारांच्या पारड्यात 126 मते पडली. नितीशकुमारांच्या विरोधात अवघी 24 मते पडलीत.

यापूर्वी, विधानसभेत नितीशकुमारांनी विश्वासदर्शक ठराव मांडला तेव्हा बहुमताचा अनादर केल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला होता. त्यामुळे भाजपचा एकही आमदार मतदानात सहभागी होऊ शकला नाही. विधानभवनात चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेता नंद किशोर यादव यांनी नितीशकुमारांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

नितीशकुमार विधानसभेच्या विशेष अधिवेशन विश्वासदर्शक ठराव दाखल केल्यानंतर त्यावर चर्चा होवून त्यानंतर मतदानही होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

भाजपच्या सहा आमदारांची दांडी-
भाजपचे ज्येष्ठ नेता सुशील कुमार मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला सहा आमदारांनी दांडी मारली. त्यात प्रेम कुमार, राणा गंगेश्‍वर, वीणा सिंग, अमरनाथ गामी, अविनाश कुमार आणि विक्रम कुंवर या आमदारांचा समावेश आहे. गैरहजर राहिलेल्या आमदारांना जदयूने मंत्रीपदाचे आमिष दाखवले असल्याचाही आरोप भाजपने केला होता. भाजपच्या सर्व आमदारांना विश्‍वासदर्शक ठराव मांडल्यानंतर नितीशकुमारांविरोधात मतदान करण्याचे व्हिपही जारी केला होता.

दरम्यान, सरकारला लोक जनशक्ती पक्षाच्या एका आमदाराने पाठिंबा जाहीर केला होत. भाजप-"जेडीयू'मध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळातून भाजपच्या 11 मंत्र्यांना निलंबित केले होते. त्यामुळे ‍नितीश सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडवा लागला.

बिहारच्या 243 सदस्यांच्या विधानसभेत जेडीयूचे 118, भाजपचे 91, राजदचे 22, कॉंग्रेसचे 4, भाकपचे 1, लोजपचा 1 आणि अपक्ष 6 असे बलाबल होते.