आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Boom In IT, Madras IIT Two Students Get 1.31 Crores Rupee Package

आयटी क्षेत्रात पुन्हा बूम, मद्रास आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांना 1.31 कोटींच्या पॅकेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू/नवी दिल्ली- आयटी उद्योगावरील तीन वर्षांनंतर मंदीचा काळ ओसरण्याची चिन्हे दिसत असून या क्षेत्रात पुन्हा पूर्वीची बूम परतली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) अनेक विद्यार्थ्यांना यावर्षी बहुराष्‍ट्रीय कंपन्यांनी एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्तीचे वार्षिक पॅकेज ऑफर केले जात आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी मद्रासच्या कॉम्प्युटर सायन्सच्या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 कोटी 31 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली. वाढीव पॅकेजचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहू शकतो.
कन्सल्टिंग फर्म टेलॉयटच्या म्हणण्यानुसार आयटी इंडस्ट्रीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून मंदीचे सावट सुरू होते. त्यामुळे कंपन्यांकडून मोठ्या पॅकेजची ऑफर देणे जवळपास बंदच होते. अधिकारी, कर्मचा-यांना वेतनवाढ तर नव्हतीच. उलट अनेक कंपन्यांनी तीन वर्षांपासून वाढ नव्हती, वेतन घटले होते सीईओंचे वेतन घटवले होते. ओरेकलचे सीईओ लॅरी एलिसन यांचे वेतन 2013 मध्ये 18 टक्क्यांनी कपात करण्यात आले होते. त्यांचे वेतन 9.93 कोटी रुपये होते. त्यात कपात करून ते 8.25 कोटी केले गेले. शिवाय त्यांना बोनसही मिळू शकला नव्हता. याची कारणे कंपन्यांना त्यांचे निर्धारित टार्गेट पूर्ण करण्यात आलेले अडथळे हेच होते.
आता मंदीचे सावट दूर होण्याची चिन्हे असून कर्मचा-यांना वाढीव पॅकेजच्या ऑफर्स दिल्या जाऊ लागल्या आहेत. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारू शकते, नव्या नोक-याही निर्माण होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशांतर्गत कंपन्यांच्या ऑफर्सही दुप्पट
आयटी क्षेत्रात देशांतर्गत बाजारपेठेतील कंपन्याही यावर्षी 50 लाख रुपयांपर्यंत ऑफर देऊ लागल्या आहेत. गेल्यावर्षी 26 लाख 82 हजार रुपयांचे सर्वात मोठे पॅकेज ऑफर करण्यात आले होते.
14 टक्क्यांची वाढ अपेक्षित : नेसकॉम
४2014 मध्ये आयटी क्षेत्रात 12 ते 14 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या आधारे कंपन्या नवी उद्दिष्टे समोर ठेवून बाजारात उतरल्या आहेत. जागतिक पातळीवर टेक्नॉलॉजीची मागणी वाढत आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये 5 लाख 23 हजार कोटींची निर्यात अपेक्षित आहे. भारताला त्यातून 1 लाख 22 हजार कोटींचा महसूल मिळेल.’’
एन. चंद्रशेखरन्, अध्यक्ष नेसकॉम
भारतात श्रीमंतांचा खजिना आटतोय
आर्थिक मंदीसदृश परिस्थितीचा फटका केवळ ‘आम आदमी’लाच नव्हे तर श्रीमंतांनाही बसतो आहे. देशात या वर्षी अब्जाधीशांच्या संख्येत व त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. जगभरातील श्रीमंतांवर यूबीएसएन एजीने जारी केलेल्या ‘वर्ल्ड अल्ट्रावेल्थ अहवाल 2013’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार यंदा देशातील अब्जाधीशांची संख्या 109 वरून 103 पर्यंत खाली घसरली आहे. इतकेच नव्हे तर श्रीमंतांच्या संपत्तीत 5.5 टक्क्यांची घट झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, ‘अब्जाधीशांची संपत्ती त्यांच्या वारसांमध्ये विभागली गेल्याने त्यांची संख्या वेगाने घटत आहे. जर भारतीय श्रीमंतांच्या यादीत 3 कोटी डॉलरपर्यंत (जवळपास 1.87 अब्ज रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असणा-यांना जोडले तर या श्रेणीत येणा-या अब्जाधीशांच्या यादीत 120 श्रीमंत लोक सहभागी होतात.
त्यांची संख्या वाढून 7, 850 पर्यंत जाते. ब्रिक्स देशांमध्ये एकमेव भारतच असा देश आहे की येथे नव्या अब्जाधीशांची संख्या इतकी मोठी आहे.’