आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्‍मू-काश्‍मीरला पुन्‍हा भूकंपाचा धक्‍का, घरांना गेले तडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये पुन्‍हा एकदा भूकंपाचे झटके बसले आहेत. रिश्‍टर स्‍केलवर 5.2 तीव्रतेच्‍या झटक्‍याची नोंद झाली आहे. भूकंपामुळे जम्‍मूतील अनेक घरांना तडे गेले असून लोक घराबाहेर आले आहेत.

गेल्‍या 24 तासांत भूकंप होण्‍याची ही दुसरी वेळ आहे. रात्री सुमारे तीन वाजता आलेल्‍या या भूकंपाचा केंद्रबिंदू किश्‍तवाड येथे होता. यापूर्वी शुक्रवारी सकाळी आठ वाजण्‍याच्‍या सुमारास आलेल्‍या भूकंपाचा केंद्रबिंदूही किश्‍तवाडच होता. जम्‍मू काश्‍मीरशिवाय पंजाब आणि हिमाचल येथेही भूकंपाचे झटके बसले होते.