आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब: अकलिया कला गाव एकेकाळी खुन्यांचे म्हणून प्रसिद्ध; पण 4 वर्षांत एकाही गुन्ह्याची नोंद नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा- दररोज मारामाऱ्या आणि खून अशा दुष्टचक्रात अडकलेल्या अकलिया गावाचे नाव पंजाबात प्रसिद्ध होते. परंतु आता तेथील परिस्थिती बदलत चालली असून गेल्या चार वर्षांत पोलिस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. कारण, तेथील पंचायत व्यवस्थेने यावर तोडगा शोधून वाद तेथेच मिटवण्यास सुरुवात केल्याने गावाची प्रतिमा सुधारत आहे.   
 
सप्टेंबर २०१३ मध्ये पंचायतीची स्थापना झाल्यानंतर सर्व खटले आपसात तडजोडी करून सोडवले. येथे रोज सकाळी ६ ते १० पर्यंत पंचायतीची बैठक होते. यामध्ये गावातील वाद  मिटवले जातात. सुमारे ६५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ४ वर्षांत ६५० हून अधिक खटल्यांवर तोडगा शोधून काढला. या सर्व खटल्यांच्या नोंदी एका रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातात.

नियमाचे पालन स्वखुशीने केले जाते   
- गावातील कोणच्याही घरात काम करणाऱ्या नोकरास काम सोडून दुसऱ्याकडे काम करायचे असल्यास त्याला मालकाकडून नाहरकत घ्यावे लागत होते. जर मागच्या मालकाकडून आगाऊ उचल घेतली असेल तर नवा मालक तो परत करेल.   
- गावच्या कोणाही व्यक्तीस पेन्शन देण्याआधी त्याच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली जातात. पंचायत सहमत असेल तर त्याला पेन्शन मिळेल.   
- गावात आनंदाचा क्षण असेल तर किन्नरांना खुशी देण्याचे दर ठरलेले आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी ११०० रुपये आणि इतरांसाठी ५०० रुपये असे दर आहेत.   

शिक्का देण्यापासून भेट देणाऱ्यांच्या नोंदी   
पंचायतीच्या कामावर कोणी दोषारोप करू नये यासाठी प्रत्येक कामाची लेखी नोंद ठेवली जाते. कोणत्याही कागदपत्रांवर शिक्का देण्यापासून ते गावात भेट देणाऱ्यांची नोंदही ठेवण्यात येते. या नोंदी ठेवण्यासाठी वेगवेगळे रजिस्टर आहेत. पंचायतच्या  जावक रजिस्टर ८० हून जास्त नोंदी आहेत. पंचायत  नरेगाचे काम देण्याअाधी एका जागेवर उद्घोषणा करते.

खुनी अकलिया असे नाव होेते   
२०१२ मध्ये खून, मारहाण यामुळे गावाचे नाव खुनी अकलिया असे होते. गावातील सर्व खटले येथेच सोडवली. आता गावाला पुन्हा अकलिया कला असे नाव मिळाले.   
- अमरदीप कौर, सरपंच, अकलिया कला  

लोकांना जागृत करतो   
गावाला भांडणतंट्यापासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी लोकांना जागरूक केले जाते. त्यात गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. समाजसेवक या नात्याने गावात असे सर्व प्रयत्न केले जातात.  
स्वर्ण सिंग, जिल्हा प्रधान, रुरल क्लब्ज
 
बातम्या आणखी आहेत...