आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात: भरधाव ट्रकने बाइकस्वाराचा केला चेंदामेंदा, दोन दुकानेही केली उद्ध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची (झारखंड) - येथे मैकलुस्कीगंजमध्ये रविवारी एका हायस्पीड डंपरने एका बाइकस्वाराला चिरडले. अपघातानंतर डंपर एका रेशन दुकान आणि गॅरेजमध्ये घुसले. यामुळे ते उद्ध्वस्त झाले. चिरडल्यामुळे बाइकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचा ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस मुख्यमंत्री प्रकाश यादव यांच्या नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. अपघात एवढा भीषण होता की, बाइकस्वार तरुणाचा मृतदेह काढण्यासाठी कुणाचीच हिंमत झाली नव्हती.

डंपरमुळे गॅरेज आणि रेशन दुकानांचीही हानी झाली. दोन्ही दुकाने क्षतिग्रस्त झाली. आजूबाजूच्या लोकांनी पळून जाऊन आपला जीव वाचवला. 
- या घटनेच्या विरोधात या रोडवर दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याच्या मागणीसाठी लोकांनी रस्त्यावरच निदर्शने केली. तब्बल 4 तास येथे प्रचंड गर्दीमुळे चक्का जाम झाला होता. डंपरला जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळावरून हटवण्यात आले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...