आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Crore Lord Hunuman Devotee Singing Human Chalisa

सव्वा कोटी हनुमान भक्त करणार सामुदायिक हनुमान चालिसाचे पठण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशभरासह विदेशात महापर्व कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. जयपूरमध्येही यानिमित्ताने विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते 8 दरम्यान सव्वा कोटी हनुमान भक्त सामुदायिक हनुमान चालिसा पठण करणार आहेत. व्यवस्थापन गुरू पं. विजयशंकर मेहता हे या वेळी लंका कांड सादर करतील. तसेच ‘एक शाम जीत के नाम’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल.

हनुमानाच्या माध्यमातून दुर्गुणांचा नाश कसा करावा, याचे सूत्र ते उलगडणार आहेत. रावण दहनापूर्वी सर्व ठिकाणी सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन या निमित्ताने केले जाणार आहे. संस्कार, आयबीसी 24 या वाहिन्यांवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याचे कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाहेती आणि समन्वयक सी.एम.शारदा यांनी सांगितले. तसेच संपूर्ण कार्यक्रम ऑनलाइनही पाहता येणार असल्याने लॅपटॉप, मोबाइल यावरही कार्यक्रम पाहता येणार आहे.


वर्षभरात पाच कार्यक्रम : वर्षभरात पाच वेळा पं. मेहता यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुढच्या वर्षी 2014 मध्ये एक शाम जीवन के नाम (महापाठ, रामनवमी, रायपूर), एक शाम रिश्तो के नाम (महाउत्सव, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला, इंदूर), एक शाम देश जीत के नाम (महापर्व, दस-याच्या पूर्वसंध्येला, जयपूर), एक शाम स्वागत के नाम (महाउत्सव, डोंबिवली, 31 डिसेंबर) या प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तर 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने एक शाम युवाओं के नाम या कार्यक्रमाचे आयोजन रांची येथे करण्यात येणार आहे. देशभरातील विविध शहरांबरोबर अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड, हॉलंड आणि पाकिस्तानातही महापर्वाची जोरदार तयारी केली जात आहे.