आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal Elections : Violence Mars Third Phase, One Killed

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट ; १ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान झालेल्या बाँबस्फोटात माकपच्या एका समर्थकाचा मृत्यू झाला. इतर राजकीय पक्षांचे चार जण हिंसाचारात जखमी झाले. ८० टक्के मतदान झाले होते.

राज्यातील ६२ मतदारसंघापैकी १६ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. उन्हाचा कडाका असतानाही मतदार आपला हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. बरद्वान जिल्ह्यात उष्माघातामुळे एका मतदान अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे मतदान अधिकारी प्रभाव टाकत असल्याच्या कारणावरून बरद्वानमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर त्यांच्याकडील सूत्रे काढून घेण्यात आली. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शिबापाडा भागात माकपचे समर्थक ताहिदूर इस्लाम या ३५ वर्षीय व्यक्तीचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अन्वर खान यांना अटक करण्यात आली. निवडणूक समितीला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवरून झळकल्या. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. कोलकात्यात ४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.