आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनुमान बनलेल्या कलावंताचा ताेल गेल्याने कोसळून मृत्यू, धोकादायक स्टंट कोणतीही सुरक्षा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीकानेर(राजस्थान) - रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका बजावणाऱ्या कलावंताचा ४० फूट उंचावरुन पडून मृत्यू झाला. त्याचे वय ६१ वर्षे इतके होते. रामलीलेत लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यानंतर संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हा कलावंत जात होता. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. संजीवनी वनस्पती आणण्यासाठी गेलेला कलावंत चाळीस फूट उंचीवर दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत हनुमानासारखा उड्डाण घेण्याचा अभिनय घेत होता. या दरम्यान त्याचे संतुलन गेले आणि तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी लगेच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. लूणकरणसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धन्नाराम गेल्या ३५ वर्षापासून हे पात्र निभावत होता. परंतु गेल्या दोन वर्षापासून त्याने रामलीलेत हनुमानाचे पात्र करण्याचे काम थांबवले होते. यावर्षी त्यांनी रामलीलेत सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली होती.
६१ वर्षीय धन्नाराम ४० फूट उंच बांधलेल्या दोरखंडावर हनुमानाप्रमाणे उड्डाण घेण्याचा प्रयत्न करत असत. यासाठी त्यांनी सुरक्षेची कोणतीही काळजी ते घेत नसत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास रामलीला चालू असताना हनुमान मंदिर परिसरातील इमारतीच्या वरच्या बाजूला चाळीस फूट उंचावर दोरखंड बांधलेला होता. त्याचे दुसरे टोक ५० फूट अंतरावरील वरच्या बाजूला बांधण्यात आले होते. धन्नाराम मंचाच्या जवळ पोहचला होता पण त्याचा तोल गेल्याने मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत अाहे.
बातम्या आणखी आहेत...