आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट चकमकीतील हत्येप्रकरणी ४७ पोलिस कर्मचारी दोषी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तरप्रदेशात पिलिभीतमध्ये २५ वर्षांपूर्वी १० शीख यात्रेकरूंना बसमधून उतरवून त्यांना दहशतवादी ठरवून बनावट चकमकीत मारल्याच्या आरोपात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ४७ पोलिसांना दोषी ठरवले आहे. त्यांना एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश लल्लूसिंह यांनी दोन्ही बाजूंच्या पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला. त्यानंतर न्यायालयात उपस्थित असलेल्या २० आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.या आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे असून त्यांना एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या खटल्यात एकूण ५७ आरोपी होते. परंतु खटला सुरू असतानाच्या काळात त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला होता.