आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिलाई मशीनमध्‍ये लपवले होते दीड किलो सोने, विमानतळावर झाला भांडाफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - जयपूर विमानतळावर शुक्रवारी कस्टम विभागाच्‍या टीमने एका व्‍यक्‍तीकडून तब्‍बल दीड किलो सोने जप्‍त केले आहे. मस्‍कटवरुन जयपूरला हा व्‍यक्‍ती आला होता. विमानतळावर त्‍याच्‍याकडून सोन्‍याची बिस्‍कीटे जप्‍त केली. ही बिस्‍कीटे त्‍याने शिलाई मशीनमध्‍ये लपवली होती. बाजारात या सोन्‍याची किंमत सुमारे 45 लाख रुपये आहे.
पथक करत आहे चौकशी..
- जयपूर विमानतळावर शुक्रवारी सकाळी मस्‍कटवरुन एक विमान आले.
- याच विमानातून एक प्रवासी उतरला. पोलिसांना तो संशयित वाटला.
- दरम्‍यान त्‍याच्‍याकडील सामानाची तपासणी केली. तो शिलाई मशीन घेऊन आला होता.
- ही मशीन उघडल्‍यावर त्‍यातून एक एक करून दिड किलो सोन्‍याचे बिस्‍कीटं बाहेर आली.
- कस्टम विभागाच्‍या अधिका-यांनी या प्रवाशाला ताब्‍यात घेतले आहे.
- त्‍याची कसून चौकशी केली जात आहे.