आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये औषध विक्रेत्याची निर्घृण हत्या, हिंसाचार उसळल्यानंतर फायरिंग; एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समस्तीपूर- बिहारमधील समस्तीपूर येथे दिवाळीच्या दिवशी औषध विक्रेत्याच्या निर्घृण हत्या झाल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. संतप्त जमावाने आज (शुक्रवार) सकाळी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना 10 राउंड फायरिंग करावी लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या परिसरातील वाहने पेटवली. पोलिसांना मारहाण केली.

ढिम्म पोलिस प्रशासनाने भडकली हिंसा...
- ताजपूर भागात दिवाळीच्या दिवशी (गुरुवारी) अज्ञात मारेकर्‍यांनी औषध विक्रेते जनार्दन ठाकूर यांची हत्या केली होती. शुक्रवारी सकाळी शेकडो लोक रस्त्यावर उतरले.
- मारेकर्‍यांना अटक करा, ही मागणी करत संतप्त जमावाने ताजपूरमध्ये बाजार बंद पाडला. एनएच 28 हायवेवर जाळपोळ करून रास्ता रोको केला. जमावाने पोलिस स्टेशनला घेराव घालून पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली. ठाणे परिसरात 4-5 वाहने पेटवली.

पोलिसांनी स्वत:ला कैद केले ठाण्यात...
- संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 10 राउंड फायरिंग केली. या फायरिंगमध्ये एका  आंदोलकांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव पसरला होता.
- संतप्त जमावाने पोलिसांवर हल्लाबोल केल्याच्या पार्श्वभूमीवर काही पोलिसांनी ठाण्यात स्वत:ला कैद करून घेतले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कुमक बोलवण्यात  आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... बिहारमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...