आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Man Slap To Haryana Cm Bhupendra Singh Hudda

पानीपत रोड शो दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डांना युवकाने लगावली चपराक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - पानीपत येथील कार्यक्रमादरम्यान एका युवकाने हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांना चपराक लगावली आहे. पानीपत मधील संजय चौक येथे एका कार्यक्रमासाठी हुड्डा आले होते. तेव्हा एका युवकाने त्यांच्या गाडीवर चढून त्यांना चपराक लगावली आणि त्यानंतर तो म्हणाले, लाच दिल्यानंतरही मला सरकारी नोकरी मिळाली नाही.
मुख्यमंत्री हुड्डा यांच्यावर हात उचलणा-या युवकाचे नाव कमल मखीजा असल्याचे सांगितले जात आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आणि माध्यमांपासून दूर नेले. पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या सर्व पोलिसांची यादी मागितली आहे.
यामुळे युवक यशस्वी झाला
मुख्यमंत्री उघड्या जीपमध्ये होते. जीपच्या दुतर्फा गर्दी होती आणि लोक मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ पोहोचले होते. याचाच फायदा संतप्त युवकाने उचलला.
हा युवक विरोधी पक्षाचा आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.