आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी पार्टीला धोक्याची घंटा; आणखी एका आमदाराने दिला विधान परिषदेचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- समाजवादी पार्टीचे आमदार अशोक बाजपेयी यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने समाजवादी पार्टीला आणखी एक धक्का बसला. त्यांच्या राजीनाम्यामुळे समाजवादी पार्टी सोडणाऱ्या आमदारांची संख्या आता ४ झाली आहे. 

पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप बाजपेयी यांनी केला. त्यामुळेच तीन आमदारांनी सपा आमदारांनी सपाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, असे ते म्हणाले. बाजपेयी खटला दाखल करण्याच्या मन:स्थितीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पक्षाचे नेते मुलायमसिंह यांना पक्षात फारसे स्थान उरलेले नाही. 

नेताजींच्या कार्यपद्धतीला कंटाळलो होतो. अशा अवस्थेत पक्ष बळकट करण्याचे काम करणे अवघड झाले होते.  पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात आहे.  म्हणूनच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा सभापती रमेश यादव यांच्याकडे पाठवला आहे, असे बाजपेयी म्हणाले. विधान परिषदेत सपाचे ६३ सदस्य असून बसपचे ९, भाजपचे ८, काँग्रेसचे २, शिक्षक आमदार ५  असे संख्याबळ आहे. 

विधान परिषदेत ५ जागा रिक्त  
डाॅ. सरोजनी अग्रवाल यांनीही मुलायमसिंह यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ४ ऑगस्ट रोजी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, २९ जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लखनऊ दौऱ्यावर आले असताना समाजवादी पार्टीचे बुक्कल नवाब, यशवंतसिंग आणि बसपचे ठाकूर जयवीरसिंग यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेत मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींसह मंत्रिमंडळातील ५ सदस्यांची तेथे वर्णी लागू शकते.
बातम्या आणखी आहेत...