आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावाने DSP ला दगडांनी ठेचून ठार मारले, मशिदीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची काढत होता छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
{ अय्युब यांचे पार्थिव श्रद्धांजली  वाहण्यासाठी आणण्यात आले तेव्हा त्यांचा मुलगा. - Divya Marathi
{ अय्युब यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी आणण्यात आले तेव्हा त्यांचा मुलगा.
श्रीनगर - श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री संतप्त जमावाने जामिया मशिदीसमोर तैनात डीएसपी मोहंमद अय्युब पंडित यांची दगडाने ठेचून हत्या केली. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात सापडला. हा प्रकार घडला तेव्हा मशिदीमध्ये फुटीरवादी नेते मीरवाइज लोकांना उपदेश करीत होते. 
 
नग्न करून ठेचले 
जमावाने गुरुवारी रात्री मशिदीजवळ तैनात अय्युब यांना पकडून नग्न केले, नंतर दगडांनी ठेचले. जामा मशिदीसमोर एक समूह मशिदीतून बाहेर येत होता. इतक्यात त्यांनी दोन लोकांना फोटो काढताना बघितले. त्यांना संशयित समजून जमावाने हल्ला केला. अय्युब यांनी अडवले तेव्हा जमावाने त्यांच्यावरच हल्ला केला. दरम्यान, मशिदीतील मिरवाइज यांच्या उपस्थितीची चौकशी होणार असल्याचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी सांगितले. 
 
 
 > आमच्या प्रामाणिक अंकलला या लोकांनी जिवािनशी मारले. आम्ही इंडियन आहोत... होय, इंडियन आहोत आम्ही... 
- अय्युब यांच्या पुतणीची भावना.
 
> मिरवाइजला जाऊन विचारा. काश्मिरीच काश्मिरीला, मुस्लिम मुस्लिमांना मारत आहे. कुठे गेला तुमचा गिलानी? 
- अय्युब यांचे नातेवाईक.
 
मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती म्हणाल्या...
 अय्युब मशिदीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची छायाचित्रे काढत होते, असा जमावाचा आरोप होता. पोलिसांचा संयम सुटेल तेव्हा यांची अडचण होईल
 
काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?
- काश्मिरच्या जामिया मशीद परिसरात गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेला हा प्रकार अतिशय विदारक आहे. हे कृत्य करणारे लोक नरकात जळावेत अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. 

- माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रेन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पक्षाकडून पीडिताच्या कुटुंबियाला 10 लाखांची मदत जाहीर केली. तसेच अशा हल्ल्यांमध्ये शहीद होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य लक्षात घेता पोलिस निधीत आपल्या आमदारकीचे एका महिन्याचे वेतन दिले.

गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली घटना
- श्रीनगरमधील नोहट्टा भागात जामा मशिदीतुन एक गट बाहेर येत होता. या जमावाने दोन लोकांना रोखले. त्यांना या दोन व्यक्तींच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांनी त्यांना ओळख विचारली.
- जमावाने आरोप लावला की हे दोघे फोटो घेत होते. त्यांनी गोळीबार केला यात तीन लोक जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...