आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only 24 Hours; 22 Thousand People Life In Trouble

उत्तराखंडातील महाप्रलय: बचावकार्यासाठी पोलिसांच्या हाती दोरखंड, टॉर्च!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुद्रप्रयाग- मदत छावणीत काळीज चिरणारा आक्रोश. डोंगराएवढे दु:ख घेऊन लोक डोंगरावरून परतत आहेत. वेदनांच्या खाणाखुणा यात्रामार्गावर ठेवून. सरकारी यंत्रणेतील जीवघेणी बेपर्वाई पावलोपावली दिसते. पोलिस ठाण्यांत बचावासाठी आहेत दोरखंड, टॉर्च. बचाव पथकाच्या नावाखाली तैनात होते अप्रशिक्षित होमगार्ड. देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, जोशीमठ, केदारमध्ये एखादा हेल्पलाइन नंबरही नाही. श्रीनगरला एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथून बद्रीनाथ 175, तर केदारनाथ 150 कि.मी.वर. गढवाल, कुमाऊं विकास निगम रिसॉर्ट्सची डागडुजीच करत बसला. बद्रीनाथ व केदारनाथ मंदिर समितीने आजवर सुरक्षेच्या दृष्टीने काहीही केलेले नाही. गेल्या वर्षी गौरीकुंड परिसरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 10 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भक्तांकडून लाखो रुपये दानस्वरूपात मिळवणारी ही समिती त्यांची व्यवस्था मात्र करत नाही. ही जबाबदारी समिती सरकारवर टाकत आहे. या परिस्थितीत गैरसोयींमुळे होणा-या मृत्यूंना केवळ ही समितीच जबाबदार ठरते.


बद्रीनाथ-केदारनाथ राष्‍ट्रीय महामार्ग सप्टेंबर 2011 पासून निकामी आहे. गौरीकुंड ते केदारनाथ हा 14 किमी लांबीच्या मार्गाची इतकी वाताहत झाली आहे की रिमझिम पाऊसही या रस्त्याची वाट लावतो. या गैरसोयींमुळे दरवर्षी यात्रामार्गावर 600 हून अधिक भाविकांचा हृदयविकार, दरडी कोसळल्याने तसेच अपघातांत मृत्यू होतो. यावर केदारनाथच्या आमदार शैलाराणी म्हणतात, ‘सरकार या महायात्रेचा प्रचार जोरात करते. मात्र, प्रत्यक्षात काहीही सोयी नसतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच्या परिसराला अतिक्रमणाने घेरले आहे. याच अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. म्हणूनच अधिक हानी झाली.’ बद्रीनाथचे आमदार राजेंद्र भंडारी यांच्या मते, मृतांची संख्या सरकार काहीही सांगत असले तरी प्रत्यक्षात ती हजारांत आहे. दिल्ली येथील नेहा मिश्र यांची आजी आणि आई या महाप्रलयात मृत्यूमुखी पडल्या. नेहा म्हणते, ‘या मंदिर व्यवस्थापनाला आम्ही कदापिही माफ करणार नाही. त्यांनी सहा दिवस आम्हाला मरणाच्या दारात सोडून दिले होते.’ महाप्रलयात अडकलेल्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, या भागातील आमदार, मुख्य सचिव तसेच अधिकारी दिल्लीत होते. शिवाय, डेहराडून, हरिद्वार, रुद्रप्रयाग, जोशीमठ, उत्तरकाशी, गौरीकुंड येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात तैनात अधिका-यांतच प्रचंड मतभेद आहेत. बचावकार्यात मदत करण्यासाठी इतर राज्यांतून आलेले मंत्री व अधिका-यांना मुद्दाम वेगळे ठेवले जात आहे. उत्तराखंडचे संबंधित विभागाचे सचिव भास्करानंद या लोकांना भेटतही नाहीत. एखादी योजना निश्चित करताना विश्वासातही घेत नाहीत. डेहराडूनसह इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या केंद्रांतून बाहेर राज्यांतून आलेल्या लोकांना काहीही माहिती मिळत नाही. राजस्थान, गुजरात आणि प. बंगालच्या अधिका-यांनी याबाबतची तक्रार थेट आपत्तीनिवारण मंत्री यशपाल आर्य यांच्याकडे केली आहे.
केदारचा अर्थ चिखल आणि दलदल : केदार या शब्दाचा अर्थ चिखल किंवा दलदल असा आहे. चालता चालता पाय रुतावा अशी केदारपुरी भूमी आहे. म्हणूनच या देवस्थानाचे नामकरण केदार आणि शंकराचे नाव केदारनाथ असे झाले.


दरवर्षी संकट, परिस्थिती ‘जैसे थे’
*दान 165 कोटी रुपये, जबाबदारी शून्य : बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर व्यवस्थापन समितीला दरवर्षी सुमारे 165 कोटी दान रूपात मिळतात. भाविकांच्या व्यवस्थेवर समितीचे म्हणणे असते की, आमच्याकडे ना साधने आहेत, ना मनुष्यबळ. समितीवर मंत्री, नेतेच.
* सरकारचे 70 कोटी रुपयेही दिसत नाहीत : व्यवस्थेच्या नावाखाली उत्तराखंड सरकार दरवर्षी 70 कोटी रुपये खर्च करते. 2012मध्ये देण्यात आलेला 23.,4 कोटींचा आपत्कालीन निधी वेगळा. असे
असतानाही स्वच्छ टॉयलेटदेखील नाहीत.
* कोणतेही प्राधिकरण नाही : पर्यटकांच्या देखभालीसाठी ना चारधाम प्राधिकरण स्थापन झाले, ना यात्रेच्या व्यवस्थेवर निगराणी ठेवू शकेल, असा नोडल अधिकारी. याचा अर्थ जबाबदारी कोणाचीच नाही.
*भाविकांच्या संख्येवर नियंत्रण नाही : अमरनाथ, मानसरोवर यात्रेसाठी मर्यादित परमिट दिले जातात. वैष्णोदेवीतही गर्दी होताच भाविकांना थांबवले
जाते. परंतु या ठिकाणी कोणताही नियम नाही.
राज्यातील 1500 यात्रेकरू परतले
2,765 यात्रेकरू अडकून पडले होते
1,564 जण सुखरूप परतले
250 जणांशी अजूनही संपर्क नाही
40 अधिका-यांची टीम बचाव कार्यात तैनात.
650 भाविकांना शनिवारी राज्यात पाठवण्यात आले


3 कोटी भाविक दरवर्षी येतात देवाच्या भरवशावर
राहण्याची व्यवस्था
2 लाख बिछाने
75% धर्मशाळांमध्ये
25% हॉटेलांमध्ये
सरकारी व्यवस्था 0
ना सुरक्षा,
ना उपचार

4 हजार जवान
० 100 पोलिसांना आपत्कालीन उपचाराचे प्रशिक्षण. परंतु संकटात बचाव कसा करायचे हे कोणालाही ठाऊक नाही.
परिणाम केवळ बळी
रस्ते अपघातात : 2008 2009 2010

543 278 354

नैसर्गिक आपत्तीत : 220 83 176