आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांच्या खोलीत केवळ 5 जणांना एंट्री, डॉक्टर म्हणाले, आम्ही काही बोललो तर जीव जाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याला रविवारी 73 दिवस झाले. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान, या सर्वामध्येही एवढी गुप्तता आहे की, जयललितांची काळजी घेणाऱ्या नर्सना फोन बाळगण्याची परवानगीही देण्यात येत नाही. केवळ 5 जणांनाच त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी आहे.
वेंटीलेटर होत्या अम्मा..
- ऑक्टोबरतच्या अखेरीस जयललिता व्हेंटिलेडरवर असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासाळत असल्याचे समोर आले होते. त्यावेळीही त्या ठीक असल्याचेच सांगण्यात येत होते. पण त्यांच्या आजाराबाबत कोणालाही फारसे काही सांगितले जात नव्हते, त्यामुळे संशयाचे वातावरण होते.
- दरम्यान, भास्करच्या पत्रकार उपमिता वाजपेयी यांनी एका डॉक्टरला जयललितांच्या आरोग्याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने धक्कादायक वक्तव्य केले होते. माझा जीव आणि नोकरी दोन्हीलाही धोका आहे. मी काहीही बोलू शकणार नाही, असे डॉक्टर म्हणाला होता.
अडीच महिन्यापासून आजारी..
- 22 सप्टेंबरच्या रात्री 9.45 वाजेच्या सुमारास अचानक मुख्यमंत्री निवास पोएस गार्डनमध्ये जयललिता बेशुद्ध झाल्याचे लक्षात आहे.
- सीएम हाउसमधून अपोलो हॉस्पिटलचे मालक आणि मुलगी सीईओ प्रीथा रेड्‌डी यांना एक पोन आला. लगेचच अपोलोमधून एक अॅम्ब्युलन्स रवाना झाली.
- कोण आजारी आहे हे सांगण्यात आले नाही. सीएम हाऊसला पोहोचा असे अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला अचानक सांगण्यात आले.
- 30 मिनिटांनंतर जया बेशुद्धावस्थेत ग्रीम्स रोडच्या अपोलो हॉस्पिटलच्या आईसीयूमध्ये दाखल होत्या.

डॉक्टर का म्हणाला, माझ्या जीवाला धोका..
- याठिकाणी जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणीही काहीही बोलायला तयार नाही.
- अपोलो हॉस्पिटलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा फोन सध्या इंटलिजन्स एजन्सींकडून तपासला जात आहे.
- एवडी गोपनीयता बाळगण्यात येत आहे की, जयललितांच्या मेडिकल फाइल अपोलोच्या सिस्टीममधून उघडण्याचा प्रयत्न करताना आढळलेल्या 3-4 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. हा प्रकार केवळ अपोलोसाठी नाही.
- 23 ऑक्टोबरपर्यंत 43 लोकांवर मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरवल्याच्या आरोपाक गुन्हे दाखल केले आहेत. 8 जणांना तर अटकही करण्यात आली होती. विशेष म्हणजे जयललिता दाखल असलेल्या खोलीत केवळ 5 जणांनाच जाण्याची परवानगी आहे.
- त्यात जयांच्या नीकटवर्तीय शशिकला यांचाही समावेश आहे. त्या जयललितांच्या घरीच राहत होत्या. त्याशिवाय फॅमिली डॉक्टर शिवकुमार, राज्यपाल आणि इतचर दोन जण आहेत.

हॉस्पिटल स्टाफला फोन वापरण्याचीही परवानगी नाही..
- डॉक्टरांच्या पथकातील अनेक डॉक्टर आयसीयूजवळ तयार झालेल्या व्हीव्हीआयरी वॉर्डातच राहत आहेत. 9 नर्सच्या शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात येतात. त्याचे फोनही घेतलेले आहेत.
- त्यांना कोणाशी बोलण्याची परवानगीही नाही. डॉक्टर आणि स्टाफचे फोनही इंटलिजन्सच्या सर्व्हीलान्सवर आहेत. दोन दिवसांपूर्वी मेडिकल बुलेटिन मध्ये त्या बोलत असल्याचे सांगितले होते.
- पण जयललितांच्या गळ्यात ट्रायको नळी लावलेली आहे. त्याद्वारेच त्यांना फ्लूड आणि ऑक्सिजन दिले जात आहे.
- जयललिता पॅसिव्ह फिजिओथेरपीवर आहेत त्यांना हात पाय हलवता येत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
- लंडनहून आलेल्या डॉक्टरांनी त्यांना हसायला सांगितले तेव्हा त्या हसल्यादेखिल. सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे वजनही कमालीचे घटले आहे. सध्या प्रकृती चिंताजनक आहे.
पुढे पाहा, संबंधित Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...