आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Speaking Person How Develop Country, Sonia Gandhi Indirectly Critise On Modi

आपलाच ढोल बडवणारे देशाचा विकास काय करणार, सोनिया गांधींचा मोदींवर घनाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलबर्गा - काही लोक स्वत:च्याच नावाचा ढोल बडवत आहेत. अशी माणसे देशाचे भले काय करणार? जे लोक विषाची शेती करत आहेत, त्यांना देशाची जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले. कर्नाटक दौ-यावर आलेल्या सोनियांनी येथे आयोजित जाहीर सभेत नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
सोनिया म्हणाल्या, ‘जनतेला अशा लोकांचे मागील कारनामे लक्षात ठेवून सावध राहावे लागेल. काही लोक जातीयवादी आहेत, तर काही नुसतेच सल्ले देतात. अशा लोकांना जनता समर्थन देणार नाही. विरोधी पक्ष या ना त्या मार्गांनी सत्ता मिळवण्याची धडपड करत आहे. त्यासाठी ते कटकारस्थाने करत असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. विरोधकांना गरिबांची काळजी नाही. केवळ काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच गरिबांचे कल्याण करू शकते.’
हेलिकॉप्टर सौदा प्रकरणात नवा खुलासा
नवी दिल्ली । ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात तपास संस्थेने न्यायालयात एक पत्र सादर केले आहे. हा करार करण्यासाठी ख्रिश्चियन मायकेल याने मध्यस्थी केली होती. त्याने ऑगस्टा वेस्टलँडच्या अधिका-यांना या सौद्यासाठी सोनिया गांधी यांच्या सल्लागारांशी संपर्क साधण्याचा पर्याय सुचवला होता. मार्च 2008 च्या या पत्रात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व तत्कालीन राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन, अहमद पटेल, प्रणव मुखर्जी, वीरप्पा मोइली, ऑस्कर फर्नांडिस, एम. के. नारायणन, विनय सिंह यांची नावे आहेत.