आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposed To Repair Shahid Bhagat Singh Home In Pakistan

पाकिस्तानात शहीद भगत सिंग यांच्या पिढीजात घराचा जीर्णोद्धार; नेटिजन्सकडून आगपाखड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शहीद भगत सिंग यांचे पिढीजात घर)

अमृतसर- पाकिस्तानातील फैसलाबाद जिल्ह्यातील बंगा गावात सरकारद्वारा शहीद- ए-आजम भगत सिंग यांचे पिढीजात घर आणि शाळेचा जीर्णोद्धार केला जात आहे. यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, कट्टरपंथी विचारधारा असलेल्या हिमायतींनी या कार्याला विरोध दर्शवला आहे.

एका मार्केटिंग कंपनीचे व्यवस्थापक कनीज फातिमा यांनी एका सोशल साइटवर शहीद भगत सिंग यांच्या घराची डागडुजी का? या शीर्षकाखाली पोस्ट केली आहे. अल्लाहला सोडून शिख व्यक्तीच्या घराला इतके का महत्त्व दिले जात आहे. ही फारच दुदैवी गोष्ट आहे.
कनीज यांच्या वक्तव्याचे समर्थन करत मजीद नामक एका व्यक्तीने लिहिले आहे की, लोकांना खायला अन्न नाही. औषधीअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे आणि राज्य सरकार शहीद भगत सिंह यांच्या घराची डागडुजी करण्यात व्यस्त आहे.
तसेच नाजनीन वडेच नामक एका तरुणीने टिप्पणी केली आहे की, देशात अनेक ऐतिहासिक इमारती असून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसून आमच्याशी काही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या घराची डागडुजी करत आहे. दुसरीकडे, एका शिख व्यक्तीसाठी कोट्यवधी रुपये वाया घालणे योग्य आहे काय? असा सवाल जरक खान नामक एका व्यक्तीने उपस्थित केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानातील फैसलाबादमधील बंगा गावात शहीद-ए-आझम भगत सिंग याच्या पिढीजात घराच्या डागडुजीचे काम सध्या सुरु आहे. राज्य सरकार या कामात सुमारे आठ कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, इंटरनेटवर राज्य सरकार विरोधात आगपाखड सुरु झाली आहे. लाहोरमधील एका चौकाला शहीद भगत सिंग यांचे नावे देण्याच्या प्रस्तावाला कट्टरपंथींनी मोठा विरोध केला होता.
भगत सिंग दोन्ही देशांसाठी शहीद झाले- प्रा. हुसेन
भगत सिंग भारत-पाकिस्तानासाठी शहीद झाले. भगत सिंह यांनी ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याची लढाई लढली. त्या काळा पाकिस्ताना हा भारतात होते. मात्र, नव्या पीढीला देशासाठी बलिदान देणार्‍या शहीरांचा विसर पडल्याचे लाहोरचे प्रा.आबिदा हुसेन यांनी 'दैनिक भास्कर'शी बोलताना सांगितले.
दुसरीकडे, फैसलाबादमधील वकील अजीम आलम यांनी सांगितले की, पाकिस्तानातील काही लोकांनी मागणी केल्यानंतरच शहीद भगत सिंग यांचे प्राचिन घराची डागडुजी केली जात आहे. या कार्याला विरोध करणे फारच चुकीचे आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, शहीद भगत सिंग यांचे पाकिस्तानातील प्राचिन घराची छायाचित्रे...