आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑपरेशन जाल: माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून डीजीपीने उध्दवस्त केल्या छावण्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/लातेहार - पाकूड येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस अधीक्षक अमरजित बलिहार यांच्यासह सात पोलिस जवान शहिद झाले आहेत. त्याआधी कुमंडी आणि जवळपासच्या परिसरात गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेल्या 'ऑपरेशन जाल-4' ची आता कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

शनिवारी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व केले. शनिवारच्या रात्री ते जवानांसोबत जंगलामध्येच मुक्कामी होते. रविवारी पाहाटे सुर्योदयाआधीच मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माओवाद्यांच्या ठिकाण्यांना लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला. यात माओवाद्यांच्या अनेक छावण्या उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. यावेळी डीजीपींनी जवानांच्या हिंमतीची दाद दिली. तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना संरक्षणाची हमी दिली. सोमवारी देखील ही मोहिम सुरु ठेवण्यात आली आहे.

कुमंडी आणि आसपासच्या परिसरात 24 जूनपासून ऑपरेशन जाल-4 ला सुरुवात करण्यात आली आहे. ऑपरेशनच्या 14 व्या दिवशी मुडहर डोंगरावरील माओवाद्यांच्याच्या छावण्यांना लक्ष्य करण्यात आले. यात 12 मोर्टर सोडण्यात आले तर, अनेक राऊंड फायर करण्यात आले आहेत. डीजीपी राजीव कुमार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. रविवारी सर्च ऑपरेशन दरम्यान माओवाद्यांच्या एका प्रशिक्षण तळाला लक्ष्य करण्यात आले.