आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organisers Stopped Play Based On Prostitute Life In Varanasi

BHUमध्ये वेश्येच्या आयुष्यावरील नाटकात गोंधळ, आयोजक म्हणाले- बोल्ड होता विषय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाटकातील कलाकार - Divya Marathi
नाटकातील कलाकार
वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) शनिवारी वेश्यावृत्तीवर आधारीत एक नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यावर कलाकारांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, अशा कृत्यामुळे कलाकारांच्या भावना दुखावल्या जातात. तर, आयोजकांनी म्हटले, की विषय जास्त बोल्ड होता आणि दुसऱ्या नाटकाची वेळ होत आली होती. दुसरीकडे नाटकाला उपस्थित प्रेक्षकांमध्ये 70 टक्के महिला होत्या, त्यांनी शांतपणे नाटक पाहिले.
एका प्रॉस्टिट्यूटच्या आयुष्यावर होते नाटक
- 'मुगालते' नाटकाचे दिग्दर्शक अर्पित म्हणाल, हे नाटक निखिल सचान यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. त्यात एका वेश्येच्या जीवनावर भाष्य करण्यात आले आहे.
- 'एक लेखक एका वेश्येच्या प्रेमात पडतो. तो वेश्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी तिच्या जवळ गेलेला असतो. नंतर तो तिला सोडून देतो.'
- नाटक संपल्यांनंतर कलाकार म्हणाले, एका वेश्येवरील नाटकाचे संवाद हे बोल्ड असणारच.
- दिल्लीची प्रतिभा सांस्कृतिक संस्था आणि बीएचयू परफॉर्मिंग आर्टने नाटकाचे आयोजन केले होते.

प्रेक्षकांमध्ये 70 टक्के महिला
- अर्पित यांच्या म्हणण्यानूसार, नाटकात 30 जणांची टीम आणि पाच कलाकार काम करत होते.
- नाटक पाहाण्यासाठी 300 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यात 70 टक्के महिला होत्या.
- त्यांना सर्वांना नाटक आवडले, मात्र काही लोकांना वास्तव पचवता आले नाही.
- जवळपास 40 मिनीटांचे हे नाटक होते.

कलाकारांच्या भावना दुःखावल्या जातात
वेश्येची भूमिका साकारणारी कलाकार म्हणाली, स्टेजवर येऊन नाटक थांबवण्याचा प्रकार का झाला ? नाटकात कलाकारांचे कपडे अश्लील नव्हते, तरीही हा प्रकार का झाला हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
- अशा पद्धतीने मध्येच नाटक थांबवल्याने कलाकारांच्या भावना दुःखावल्या जातात.

आयोजक काय म्हणाले
- आयोजन मंडळातील सदस्य प्रा. पी.सी.होम्बल म्हणाले, नाटक जास्त वेळ चालले. त्यानंतर 'मत्स्य विलास' हे दुसरे नाटक सादर होणार होते.
- त्यामुळे 'मुगालते'ला थांबवण्यात आले.
- नाटक पाहाण्यासाठी आलेली रोशनी म्हणाली, समाजातील वेश्यांचे आयुष्य नाटकात गांभीर्याने दाखवण्यात येत होते.
- हे वास्तव पाहाण्याचे आणि ऐकण्याचे सामर्थ्य समाजाने दाखवले पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये, नाटकातील दृष्य