आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे सरकार रामभक्त: गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. केंद्रामध्ये रामभक्तांचे आणि जय श्रीरामची घोषणा देणारे सरकार असल्याचे त्यांनी फैजाबादमध्ये सांगितले. यावर सप नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी टीका केली. रामभक्तांच्या सरकारने अन्य धर्माच्या लोकांवर अन्याय करू नये. रामभक्त असण्याचा अर्थ मशीद पाडली जावी, गुजरात केले जावे, मुजफ्फरच्या दंगली केल्या जाव्यात,असा अर्थ होत नाही. अयोध्येहून नेपाळच्या जनकपूरला जोडणा-या राम-जानकी मार्गाची त्यांनी औपचारिक घोषणा केली. यासंदर्भात आझम म्हणाले, राम-जानकी मार्गाबाबत कोणत्याही अडचणी नाहीत. हिंदू रामाचा जेवढा आदर करतात आम्हीही करतो. परंतु आम्ही त्याचे कधी भांडवल करत नाही. बाकीचे मात्र, तसे करतात.

मी रामभक्त, अयोध्येत राम मंदिर व्हावे - राम नाईक
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी रामभक्त असल्यामुळे अयाेध्येत रामाचे मंदिर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आपला सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, आपल्यासमोर नऊ अध्यादेश आले, त्यातील सात त्वरित मंजूर केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली नाही, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री आणि मुलायम सिंह यांनीही सुधारणेची आवश्यकता व्यक्त केली आहे.