आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐलतीर-पैलतीर : एका नावेतून 80 लोक, 8 बाईक.. 4 महिने हेच चालणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेठुली घाटाहून गंगेला पार करून राघोपूर, रुस्तमपूरला बोटेने जाणारे लोक. जास्त कमाईच्या नादात जीवाशी खेळ सुरूच आहे. - Divya Marathi
जेठुली घाटाहून गंगेला पार करून राघोपूर, रुस्तमपूरला बोटेने जाणारे लोक. जास्त कमाईच्या नादात जीवाशी खेळ सुरूच आहे.
पाटणा - बिहारमधील जेठुली घाटाहून राघोपूर, रुस्तमपूर या गावांमधील संपर्काची एकमेव व्यवस्था म्हणजे बोट. येथील छोट्या बंदरावरील वर्दळ वाढू लागली असून पावसाळ्याचे पुढील काही महिने ही वाहतूक अशीच सुरू राहणार आहे.
 
एका नावेत ८० हून अधिक प्रवासी, ८ मोटारसायकल व इतर सामान. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणाऱ्या बोटींकडे यंत्रणा पाहत नाही. वास्तविक निगराणीची जबाबदारी स्थानिक पोलिस ठाण्यांची आहे. काही दिवसांपूर्वी बोट दुर्घटना घडली हाेती. त्यातून काहीही धडा न घेता अशी ‘बोट फुल्ल’ सेवा बिनबोभाट सुरु आहे. वाहतूक करताना सर्व प्रकारच्या नियमांची ऐशीतैशी करून टाकण्यात आली आहे. खरे तर सर्व बोटींवर नोंदणी क्रमांक, क्षमता इत्यादी गोष्टींचा तपशील नमूद करण्यात आला आहे. परंतु त्याचे पालन केले जात नाही. नोंदणीकृत बोटींची संख्या ३२८ आहे. बिना नोंदणीची त्याहून जास्त आहे.
 
- 328 नावांची जिल्ह्यात नोंदणी
- परंतु संपूर्ण जिल्ह्यात बेकायदा बोटी जास्त.
बातम्या आणखी आहेत...