आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये मुसळधार, जम्मूत भरदिवसा पसरला काळोख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/देहराडून- उत्तराखंडसह जम्मू-कश्मीरमध्ये कालपासून (रविवार) मुसळधार पाऊस सुरु आहे. दुसरीकडे, उत्तराखंडची राजधानी देहराडूनमध्ये आज (सोमवार) दुपारी वादळी वार्‍यासह सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मूत पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. जम्मू शहर वासियांनी सोमवारी दुपारी रात्र अनुभवली. भरदुपारी ढग दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. नंतर मुसळधार पाऊस झाला.

टिहरी जिल्ह्यातील देव प्रयागमध्ये सर्वाधिक 90 मीमी आणि देहराडूनमध्ये 72 मीमी पावसाची नोंद झाली आहे. मसूरी, कोसानी आणि अल्मोडामध्ये मुसळधार पाऊस होत आहे.

तसेच
जम्मूत अनेक भागात तुंबले पाणी...
जम्मूत सुरु असलेल्या पावसामुळे जनतेला उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाली आहे. मात्र, शहरातील अनेक भागात पाणी तुंबले आहे. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजच हवामान विमागाने वर्तवला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जम्मूत भरदिवसा पसरला काळोख