आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत समाजवादी पार्टीचा पराभव अटळ : आेवेसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- बिहार निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातील विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन आेवेसी यांनी सत्ताधारी समाजवादी पार्टीचा पराभव अटळ असल्याचे भाकीत केले आहे. कोणतीही आघाडी सपाला तारू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

समाजवादी पार्टी कितीही जोर लावत असली तरी कोणतीही आघाडी त्यांना तारू शकणार नाही. समाजवादी पार्टीवर लोकांचा रोष आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाही पूर्णपणे ढेपाळली आहे. म्हणूनच त्यांना आगामी निवडणुकीत काहीही लाभ पदरी पडण्याची शक्यता नाही. त्यांना जावेच लागेल. त्यांची सत्तेवरून हकालपट्टी होणार आहे. ही ईश्वराचीच इच्छा आहे, असे आेवेसी यांनी सांगितले. ते सोमवारी हैदराबादेत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संभाव्य आघाडीबद्दलचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर आेवेसी बोलत होते.

पक्ष व्याप्तीचे प्रयत्न
बिहार निवडणुकीत सीमांचलमधील समर्थन वगळता एमआयएमच्या पदरी फारसे काही पडलेले नाही. पक्षाला आता उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील मोठ्या अपेक्षा आहेत. त्याशिवाय देशभरात पक्षाची व्याप्ती वाढवण्यावर आेवेसी यांनी भर देण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात दोन जागी विजय मिळाला होता.