आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायपूर: मद्यधुंद ऑपरेटर झोपा काढत राहिला, ऑक्सिजनअभावी चार बाळांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- यूपीच्या गाेरखपूरप्रमाणेच छत्तीसगडमधील रायपूरच्या डाॅ. भीमराव अांबेडकर शासकीय रुग्णालयातही अाॅक्सिजनअभावी ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री प्राणवायूअभावी बालके तडफडत हाेती तेव्हा अधिकाऱ्यांनी तातडीने गॅस प्लँटवर धाव घेतली. तिथे अाॅपरेटर मद्यधुंद अवस्थेत झाेपलेला दिसला. त्याला पाेलिसांच्या ताब्यात देण्यात अाले. दरम्यान, दुसऱ्या कंपनीकडून अाॅक्सिजनचा पुरवठा करण्याची साेय करण्यात अाली, मात्र ताेपर्यंत चार बालकांचा मृत्यू झाला हाेता.

म्हणे, इतर कारणांमुळे मृत्यू
रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विवेक चाैधरी यांनी मात्र अाॅक्सिजनअभावी नव्हे, तर इतर वेगवेगळ्या कारणांनी मुलांचे मृत्यू झाल्याचा दावा केला अाहे. रुग्णालयाने या बालकांचे शवविच्छेदन करणे टाळले. कहर म्हणजेच याच रुग्णालयातील डाॅक्टरांची समिती प्रकरणाची चाैकशी करत अाहे.

> रुग्णालयापुढे पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह कवटाळून आक्रोश करताना बालाघाटचे प्रकाश आणि त्यांची आई. १५  ऑगस्टला जन्मलेल्या या बाळाला हृदय व श्वासाचा त्रास होता.
 
बातम्या आणखी आहेत...