आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P. Chidambaram Not To Contest Lok Sabha Elections News In Marathi

68 वय झाले आहे, आता पुरे झाले : चिदंबरम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुदुकोट्टाई (तामिळनाडू) - केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून अलिप्त होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता 68 वर्षांच्या वयात ते आणखी किती चालू शकणार आहेत. तिरुमय्यममध्ये चिदंबरम म्हणाले की, ‘मी आठ निवडणुका लढवल्या आहेत. 17 वर्षे मंत्री राहिलो आहे. माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयासारखी सामान्य मंत्रालये देण्यात आली नव्हती. तशी मंत्रालये देण्यात आली असती तर मी शांतपणे काम करत राहिलो असतो; पण मला गृह आणि अर्थ मंत्रालये देण्यात आली. तेथे मला दररोज 18 तास काम करावे लागले. मी 68 वर्षांचा झालो आहे. या वयात आणखी किती लांब चालू शकणार आहे? जो जन्माला आला, त्याला मातीत मिसळावेच लागणार आहे.’ चिदंबरम या वेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी तामिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून त्यांची मुलगी कीर्तीला उमेदवारी देण्यात आली आहे.