आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे रुपयांत बनवला पेसमेकर, 30 वर्षे चालणार, चार्जही होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - शहरातील इंजिनिअरिंगच्या दोन युवतींनी स्वस्तातील पेसमेकर बनवला असून तो प्रचलित पेसमेकरपेक्षा जास्त काळ चालतो, असा त्यांचा दावा आहे. असफेया खान व लवी अग्रवाल अशी या दोन तरुणींची नावे आहेत. त्यांनी बॅटरीलेस पेसमेकर (हृदयरुग्णांसाठी उपयोगात येणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र) तयार केले असून जर हे मॉडेल रुग्णाला बसवले तर ते किमान पुढील 25 ते 30 वर्षे कार्यरत राहिल. विशेष बाब म्हणजे हे पेसमेकर तयार करण्यासाठी त्यांना केवळ 500 रुपये खर्च आला आहे.
या पेसमेकरसंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली असता ते म्हणतात की हे पेसमेकरचे हे तंत्रज्ञान योग्य असेल आणि ते चांगल्या प्रकारे काम करत असेल तर ते वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे यश असेल. कारण सध्या उपयोगात असलेले पेसमेकर केवळ 8 ते 12 वर्षे सेवा देतात. शिवाय त्यावरील खर्चही जास्त असतो. बाजारातील पेसमेकरमध्ये बॅटरी असतो. ही बॅटरी दर पाच - सात वर्षांनी बदलावी लागते. असफेया खान व लवी अग्रवाल यांनी तयार केलेला पेसमेकर बॅटरीलेस असल्यामुळे त्यात बदलाची भानगड राहणार नाही. त्यात बॅटरीऐवजी सुपर कॅपॅसिटर बसवण्यात आला आहे. या पेसमेकरचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो वायरलेस असून मॅग्नेटिक फील्डद्वारे तो चार्च होऊ शकतो. त्यामुळे हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळेल. या दिशेने आणखी संशोधन सुरू आहे.
वारंवार शस्त्रक्रिया टळणार
या संशोधनाबाबत असफेयाने सांगितले की, बाजारात उपलब्ध असलेले पेसमेकर बॅटरीवर चालतात. बॅटरीचे आयुर्मान पाच ते सात वर्षे असते. त्यामुळे त्या कालावधीनंतर रुग्णांना दुसर्‍यांदा शस्त्रक्रिया करुन नवे उपकरण लावावे लागत होते. त्यामुळे त्यावरील खर्च वाढत होता.तसेच रुग्णांना त्याचा त्रासही सहन करावा लागत असे. नव्या शोधामुळे पेसमेकर बदलण्याची गरज उरणार नाही. बाहेरुनच तो वायरलेस पॉवर ट्रान्समिशनद्वारे चार्ज करता येऊ शकतो.
रुग्णांना मोठा दिलासा
लीडलेस पेसमेकर बाजारात उपलब्ध आहेत. पेसमेकरमधील बॅटरी वारंवार बदलण्याची गरज भासू नये यादिशेने विदेशात संशोधन सुरू आहे. इंदूरच्या विद्यार्थिनींनी विकसित केलेले अशा प्रकारचे पेसमेकर रुग्णांसाठी दिलासा ठरेल.
डॉ. गिरीश कावठेकर, काडियोलॉजिस्ट