आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Padmavati Controversy: Kamal Haasan Said People Should Respect Deepika Padukone Head

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावती : मी 200 % चित्रपट आणि भंसाळींच्या बाजुने, वादावर प्रथमच बोलला रणवीर सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई/ मुंबई - पद्मावती वादावर प्रथमच रणवीस सिंहने केलेले वक्तव्य समोर आले आहे. रणवीर म्हणाला की, या प्रकरणामध्ये मी 200% चित्रपट आणि डायरेक्टर संजय लीला भंसाळी यांच्या बाजुने आहे.  मला शांत राहण्यास सांगण्यात आले आहे. जी अधिकृत भूमिका असेल त्याबाबत निर्माते बोलतील. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. चित्रपटात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली आहे. 

 

दरम्यान, पद्मावती चित्रपटाचा वाद थांबण्याचे चिन्हं दिसत नाही. मंगळवारी योगी आदित्यनाथ म्हणाले की, जर धमकी देणारे दोषी असतील तर भंसाळीही दोषी आहेत. सरकारा दोघांवरही सारखीच कारवाई करेल. हरियाणाचे भाजप नेते सूरजपाल अम्मू यांनी दीपिका आणि डायरेक्टर संजय लीला भंसाळी यांचे शिर कापून आणणाऱ्याला 10 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. पद्मावतीची रिलीज डेट एक डिसेंबरची पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब सरकार यांनीही चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला आहे. 


लोकांच्या भावनांशी खेळतात भंसाळी.. 
- एक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगी म्हणाले की, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. मग ते भंसाळी असो की दुसरे कोणी. मला वाटते जर धमकी देणारा दोषी असेल तर भंसाळीही तेवढेच दोषी आहेत. कारण त्यांना लोकांतच्या भावनांशी खेळण्याची सवय लागली आहे. कारवाई झाली तर दोघांवरही सारखीच होईल. 
- सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा. एकमेकांसाठी चांगले विचार ठेवले तर चांगले वातावरण तयार होईल असे ते म्हणआले. 
- आपण आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत लेखी सूचना दिली आहे. सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे की, याबाबत सेंसॉर बोर्डाने निर्णय घ्यायला हवा. 

 

कमल हसन
मला वाटते की दीपिकाचे डोके सुरक्षिक राहायला हवे. तिच्या डोक्यापेक्षा तिच्या शरिराचा आधिक आदर व्हायला हवा. तिचे स्वातंत्र्य कसे नाकारणार. माझ्याच समाजाने माझ्याही अनेक चित्रपटांचा विरोध केला आहे. पण चर्चेत अतिवाद (एक्स्ट्रीमिझम) ला स्थान नाही. भारताच्या सेलिब्रिटींनी जागे व्हायला हवे. ही विचार करण्याची वेळ आहे. आपण बरेच काही म्हटलो आहोत, आता भारत मातेचे ऐका. 

 

वसुंधरा राजे सिंधिया (राजस्थान)
कायदा आणि सुव्यवस्था याला राज्यात प्राधान्य असते आणि ते कोणत्याही परिस्थितीत त्याचा विचार केला जाईल. जोपर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणींना पाठवलेल्या पत्रातील शिफारसींवर अंमलबजापणी होत नाही, तोपर्यंत राजस्थानात चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही. इतिहासकार आणि समाजातील प्रतिनिधींना चित्रपट दाखवून समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी असे राजे म्हणाल्या. 


कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आलेला चित्रपट राज्यात प्रदर्शित करू देणार नाही. याच्या विरोधात आंदोलन करणारे लोक योग्यच करत आहेत. 


शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश)
ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करून जर राष्ट्रमाता पद्मावती यांच्या सन्माना विरोधात चित्रपटात काही दृश्य दाखवली असतील किंवा काही म्हटले असेल, तर मध्य प्रदेशच्या धरतीवर तो चित्रपट प्रदर्शित होणार नाही. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमैय्या आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी भंसाळींचे समर्थन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...