आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावती : सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळली याचिका, म्हटले- पदांवरील व्यक्तींनी वक्तव्ये करू नये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सुप्रीम कोर्टाने पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीसाठी दाखल केलेली याचिका मंगळवारीही फेटाळून लावली. याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती लावण्याची मागणी केली होती. दरम्यान, मोठ्या पदांवर असलेल्या नेत्यांनी यासंदर्भात वक्तव्य करण्याचे टाळावे असे म्हणत सुप्रीम कोर्टाने फटकारलेही आहे. गेल्या काही दिवसांत नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात वक्तव्ये केली होती. 

 

दुसरीकडे, पद्मावती चित्रपट ब्रिटनमध्येही रिलीज करण्यावर बंदी लावण्यात येत आहे. येथे शिएटर मालकांनी धमकी दिली आहे की, हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर थिएटरला आग लावली जाईल. ठरलेल्या तारखेनुसार हा चित्रपट ब्रिटनमध्ये 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 


आक्षेपार्ह सीन हटवा 
- मनोहर लाल शर्मा यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ट हटायला हवी. तसेच संजय लीली भंसाळी यांच्यावर खटला चालवला जावा असेही म्हटले गेले होते. 
- यापूर्वी 10 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने रिलीजवर बंदी लावण्याची याचिका फेटाळून लावली होती. 
- शर्मा यांनी दावा केला आहे की,  निर्मात्यांनी कोर्टाला चुकीती माहिती दिली की, गाणे आणि प्रोमो यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC-सेंसॉर बोर्ड) ने मंजुरी दिली आहे.
- सेंसॉर बोर्डाने अद्याप चित्रपटाला सर्टिफिकेट दिलेले नाही. दरम्यान, फिल्ममेकर्सने चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलली आहे. 

 

ब्रिटनमध्ये काय झाले.. 
- ब्रिटनमध्ये चित्रपटाच्या रिलीज साठी 'ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन' (BBFC) सर्टिफिकेट देते. पद्मावतीच्या रिलीजसाठीही हे सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. शेड्यूलनुसार ब्रिटनमध्ये हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. 
- ब्रिटनमध्ये राजपुतांची संघटना 'राजपूत समाज ऑफ युके' ने सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा सर्टिफिकेट देण्याचा विरोध केला आहे. संघटनेने म्हटले की, त्यांना शांततापूर्ण मार्गाने याचा विरोध करायचा आहे. 
- चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडली असल्याचे म्हटले आहे. चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला जावा म्हणजे त्यात कोणाचे चुकीचे चित्रण होणार नाही, असेही संघटनेने म्हटले आहे. 
- संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, चित्रपट ब्रिटनमध्ये रिलीज करू नये असे आम्हाला वाटते. पण आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत. 

 

का होतोय विरोध... 
- चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजीचे महात्म्य दाखवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्याची चुकीची कृत्येदेखिल अतिशयोक्ती करत दाखवली आहेत. 
- तसेच राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. त्याशिवाय घूमर डान्समुळेही विरोध होत आहे. 
- चित्रपटात राजपूत समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचे कारण म्हणजे घूमर नृत्य पुरुषांसमोर केले जात नाही. 

 

असा सुरू झाला होता वाद..
- राजपूत करनी सेनाने याचा विरोध केला होता. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये शुटिंगच्यावेळी झाली होती. या चित्रपटात पद्मापती आणि खिलजी यांच्यात इंटिमेट सीन दाखवल्याने त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे करनी सेनेचे मत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. करनी सेनेने अनेक ठिकाणी आंदोलन करून पुतळ्यांचे दहनही केले आहे. 
- गुजरात बीजेपीने म्हटले की, चित्रपटात क्षत्रिय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलीजपूर्वी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखवायला हवा. त्यामुळे रिलीजच्या वेळी तणाव टाळता येईल. 

 

बातम्या आणखी आहेत...