आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडून 5 तासांत दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, फायरिंगमध्ये 1 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानने मंगळवारी पाच तासांमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तीन वेगवेगळ्या भागात सकाळी 5.40 पासून साधारण 11 पर्यंत फायरिंग सुरु होती. बीएसएफच्या 12 पोस्टला लक्ष्य करण्यात आले होते. त्यासोबतच अनेक निवासी भागांमध्येही मोर्टार फायर करण्यात आले. त्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. या महिन्यात पाकिस्तानने आतापर्यंत 10 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
केव्हा आणि कुठे झाली फायरिंग
- सूत्रांच्या माहितीनूसार, मंगळवारी पाहाटे 5.40 वाजता कानाचक आणि परगवाल सेक्टरमध्ये फायरिंग सुरु झाली. विशेषम्हणजे, बीएसएफ जवानांनी या सेक्टर्समध्ये दोन संशयितांना घुसखोरी करताना पाहिले या दरम्यानच फायरिंग सुरु झाली. बीएसएफने प्रथम त्यांना इशारा दिला होता , मात्र ते थांबले नाही त्यामुळे त्यांच्यादिशेने फायरिंग करण्यात आली. त्यानंतर तत्काळ पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या 12 चेकपोस्टवर जोरादार हल्ला सुरु केला. प्रत्युत्तरात बीएसएफनेही फायरिंग केली. पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटू शकली नाही.

- दुसरी फायरिंग सकाळी ११ वाजता आरएस पूरा सेक्टरमध्ये झाली. त्याआधी रविवार आणि सोमवारी ही पाकिस्तानकडून फायरिंग झाली होती. बीएसएफ सूत्रांचे म्हणणे आहे, की ज्या दोन जणांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, त्यांनी आमच्या चेकपोस्टवर तैनात जवानांच्या दिशेने फायरिंग केली होती.
उल्लेखनिय बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तानच्या नॅशनल सेक्यूरिटी अॅडव्हायजरदरम्यान 23-24 ऑगस्ट रोजी दिल्लीत चर्चा होणार आहे. त्याआधीच सीमेवर फायरिंग सुरु झाली आहे.

12 वर्षांपूर्वी झाला शस्त्रसंधी (सीजफायर) करार
भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करार नोव्हेंबर 2003 मध्ये झाला होता. करारादरम्यान दोन्ही देशांमध्ये असे ठरले होते, की सीमा आणि एलओसीवर गोळीबार केला जाणार नाही. मात्र पाकिस्तानकडून दरवर्षी अनेकाद गोळीबार होतो. 2003 आधी 1949 मध्ये कराची करारादरम्यान शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1972 मध्ये शिमला करार झाला होता. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळात 2003 मध्ये पुन्हा एकदा सीजफायर लागू करण्यात आले होते.
पाकिस्तानकडून फायरिंग आणि दहशतवाद्यांची घुसखोरी
20142015 आतापर्यंत
पाककडून किती वेळा सीजफायरचे उल्लंघन226139
घुसखोरीचा प्रयत्न किती वेळा2011
आपले किती जवान शहीद झाले4116
किती सर्वसामान्य लोक मारले गेले2615
किती दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले10138