आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी उमरला कंठस्नान; काश्मिरात सुरक्षा रक्षकांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गत 8 दिवसांमध्ये सुरक्षा रक्षकांनी 5 एन्काउंटर केले आहेत.  (फाईल) - Divya Marathi
गत 8 दिवसांमध्ये सुरक्षा रक्षकांनी 5 एन्काउंटर केले आहेत. (फाईल)
श्रीनगर - जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा रक्षकांनी लश्कर ए-तोबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले आहे. उमर असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याचा संबंध अबु इस्माईल ग्रुपशी असल्याचा दावा केला जात आहे. रविवारीच सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना घेरून कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते. तर, गेल्या आठवड्यात झालेल्या एन्काउंटरमध्ये लश्करचा टॉप कमांडर अबु दुजानासह 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गत 8 दिवसांमध्ये सुरक्षा रक्षकांनी 5 एन्काउंटर केले आहेत. 
 
 
- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी उमर हा अमरनाथ यात्रींवर हल्ला करणाऱ्या अबु इस्माईल टोळीचा सदस्य होता. 
- रविवारी रात्री उशीरा पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. 
- त्याच माहितीच्या आधारे रात्रभर पोलिस आणि लष्कराने परिसरात शोध मोहिम राबवली. पहाटेच्या सुमारास समोरून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याचवेळी चकमक उडाली.
- या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी उमर ठार झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...