आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#HeartofAsia : #HeartofAsia: मोदी म्हणाले, दहशतवाद संपवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती गरजेची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर/नवी दिल्ली - अफगाणिस्तानशी आमचे संबंध चांगले आहेत. या भागात शांतता प्रस्थापित होणे खूप गरजेचे आहे. दहशतवाद संपवण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे, अशा शब्दांत मोदींनी हार्ट ऑफ एशिया परिषदेत दहशतवादविरोधी लढण्याचे आव्हान केले.
आणखी काय म्हणाले मोदी...
अफगाणिस्तानसमोर अनेक आव्हाने आहेत, पण आपण सर्वजण त्यांचा निपटारा करू. अफगाणिस्तानसह इतर देशांशी संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. केवळ दहशतवादाच्या विरोधात नव्हे तर जे लोक या संघटनांना आर्थिक सहकार्य करण्याबरोबर त्यांना आसरा देत आहे, त्यांच्या विरोधातही उभे ठाकावे लागेल. अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित होण्यासाठी केवळ पाठिंबा असून चालणार नाही, तर त्यासाठी एकजूट होऊन सर्वांना पावले उचलावी लागणार आहेत. अफगाणिस्तानात सुरक्षा वाढवणे हा आपला प्रयत्न आहे.
दरम्यान, याआधी हार्ट ऑफ एशियामध्ये भारत आणि अफगानिस्तानदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली आहे. नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉ. अशरफ गनी यांची भेट घेतली. दोन्ही देशांदरम्यान सेक्युरिटी, स्टॅबिलिटी याशिवाय व्यापाराच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान व्यापारासाठी एक एअर कॉरिडोर बनवला जाण्याबाबत चर्चा झाल्याचेही समोर येत आहे.

पाकिस्तान वेगळा पडण्याच्या शक्यता..
- अफगानिस्तानबरोबर दिल्ली-काबूलदरम्यान रोड कॉरीडोर बनवण्याचे भारताचे प्रयत्न होते.
- हा मार्ग पाकिस्तानातून जाणार होता. त्यामुळे पाकिस्तानने त्याबाबद आक्षेप नोंदवला.
- या कॉरिडोरमुळे भारताला अफगाणिस्तानाबरोबरच काबूलच्या जवळपास असलेल्या इतर देशांशीही व्यापारी संबंध आणखी वाढवता आले असते.
- पण पाकिस्तानने आक्षेप घेतल्याने भारताने एअर कॉरिडोरचा मार्ग अवलंबला आहे.
- दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्येही चर्चा झाली.
- त्यात एअर कार्गो कॉरीडोरवर चर्चा झाली.
या कॉन्फरन्समध्ये 40 पेक्षा अधिक देशांची शिष्टमंडळे सहभागी होत आहेत. शनिवारी रात्री उशीरा मोदींची हार्ट ऑफ एशियामध्ये आलेल्या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली.
त्यात पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार आणि नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजिज यांचा समावेशही होता. न्यूज एजनसीच्या वृत्तानुसार, या भेटीत मोदींनी अफगाणिस्तान आणि या परिसरात स्थिरता निर्माण होण्यासाठी दहशतवाद आणि हिंसाचार संपणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मिटिंगमध्ये अजिज यांच्याशिवाय किर्गिस्तान, ईराण, अफगानिस्तान आणि स्लोव्हाकियाच्या मंत्र्यांचा समावेश होता.

15 तासांपूर्वीच पोहोचले अजिज..
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजिज शनिवारी सायंकाळी पोहोचले.
- कॉन्फरन्ससाठी ते रविवारी सकाळी येणार होते. पण ते 15 तास आधीच पोहोचले.
- नियोजनातील बदलामागचे कारण अद्याप काही समोर आलेले नाही.
- उरी हल्ला, त्यानंतर होणारी शस्त्रसंधी उल्लंघनाची प्रकरणे यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे.
- या तणावामुळे दोन देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. अधिकाऱ्यांमध्येही चर्चेची सध्या शक्यता नाही.

कॉन्फरन्समध्ये कोण-कोण होणार सहभागी
- न्यूज एजेंसीच्या मते, हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्समध्ये भारत, चीन, रशिया, ईराण आणि पाकिस्तानसह 14 देशांचे वरीष्ठ अधिकारी आणि 17 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
- 40 देश आणि युरोपियन युनियन सहभागी झाल्याने ही बैठक किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते.

कॉन्फरन्समधील मुद्दे...
- अफगानिस्तानात सशांती प्रस्थापित करण्याची प्रक्रिया नव्याने सुरू करणे.
- अफगानिस्तानचे साऊथ आणि सेंट्रल एशियातील देशांशी संबंध आणि व्यापार वाढवण्यावर जोर देणे.
- आशिया खंडातील दहशतवाद, कट्टरता आणि अतिरेक्यांचा खात्मा करणे.
- सुरक्षा आणि विकास ही या कॉन्फरन्सची थीम आहे.
- पांच देशांतील चाबहार रेल्वे प्रोजेक्ट आणि तापी (TAPI- तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत) गॅस पाइपलाइन प्रोजेक्टवरही चर्चा होईल.
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...