आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : 45 दिवस गुहेत राहिला नावेद; सहकार्‍यांची खरी नावे माहीत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावेदच्‍या घराचा व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा. - Divya Marathi
नावेदच्‍या घराचा व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा.

जम्मू - उधमपूरच्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर पकडला गेलेला नावेद याचे केवळ पाचवीपर्यंत शिक्षण झाले असून, पैशासाठी तो दहशतवादी झाल्‍याची माहिती त्‍याने तपास अधिका-यांना दिली. भारतामध्‍ये तो 45 दिवस गुहेत राहिला. या काळात त्‍याला भेटण्‍यासाठी अनेक लोक येत होते. दरम्‍यान, त्‍याचे सहकारी असलेल्‍या दहशवाद्यांची खरी नावे त्‍याला माहिती नाहीत. ते एकमेकांना केवळ कोटवर्डने ओळखत होते, अशी माहिती त्‍याने दिली.
21 दिवसाची ट्रेनिंग
चौकशीदरम्‍यान नावेदने सांगितले की, मी पाकिस्‍तानातील फैसलाबाद जिल्‍ह्यातील खुरिवालामधील रफीक कॉलोनीमध्‍ये राहतो. माझे वडील मजुरी करतात. पाचवीतच शाळा सोडली. सुरुवातीला आपण वडिलांसोबत मजुरी करायचो, अशी माहिती त्‍याने दिली. इंटेरोगेशन रिपोर्ट (IR) नुसार, वर्ष 2011 मध्‍ये नावेद लष्‍कर - ए- तय्यबाच्‍या संपर्कात आला. बशीर नावाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याला फैसलाबादमधील लष्‍कर-ए -तयब्‍बाच्‍या कार्यालयात नेले. त्‍याच वर्षी त्‍याला गारी हबीबुल्लाहमध्‍ये 21 दिवसांचे ट्रेनिंग दिले गेले. ट्रेनिंग संपल्‍यानंतर नावेद घरी परत आला. पण, त्‍यानंतरही तो बशीरच्‍या संपर्कात होता. पुढे बशीर याने त्‍याला मुजफ्फराबादच्‍या लष्‍कर ट्रेनिंग कॅम्‍पमध्‍ये तीन महिन्‍यांच्‍या ट्रेनिंगला पाठवले. यात त्‍याला एके-47 सह इतर शस्‍त्रे चालवण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात आले.
पिकनिकसारखे ट्रेनिंग
एका चौकशी अधिका-याने सांगितले, नावेद जेव्‍हा आर्म्स ट्रेनिंग घेत होता तेव्‍हा त्‍याला वाटत होते की, आपण दहशतवादी स्‍कूलमध्‍ये पिकनिक साजरी करत आहोत. या अधिका-याने सांगितले, नावेदचा जन्‍म 1995 मध्‍ये झालेला असून, आपण ज्‍या कृत्‍यासाठी आलो त्‍याचे काय परिणाम होणार होते, हे त्‍याला अजिबात माहिती नाही. अजूनही तो हेच समजतो की चौकशी झाल्‍यानंतर आपल्‍याला आपल्‍या घरी सोडले जाईल. शिवाय आपल्‍याला जिवे मारले नाही, याचा त्‍याला आनंद वाटत आहे. त्‍याला मार्च 2015 मध्‍ये कश्मीरच्‍या मोहिमेबद्दल सांगितले गेले. भारतात येण्‍यापूर्वी त्‍याला हूटा के एक और ट्रेनिंग कॅम्‍पमध्‍ये पाठवले गेले होते.
सहकार्‍यांचे खरे नावे माहिती नाही

नावेद याने 3 जूनला एलओसी क्रॉस केली. त्‍याला त्‍याच्‍या सहकार्यांचे खरे नावे माहिती नाहीत. त्‍यांना लष्‍कर-ए-तय्यबाच्‍या कमांडरने कोड नावे दिली होती. त्‍याच्‍यासोबत भारतात घुसलेल्‍या दहशतवाद्यांचे कोड नावे अक्शा, मोहम्मद भाई आणि नोमान असल्‍याचे त्‍याने सांगितले. ते गुलमर्गच्‍या नूरी सेक्टरमधून भारतात घुसले. त्‍यासाठी सात दिवस ते पायी आलेत. खुर्शीद नावाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍यांच्‍यासाठी गाइडचे काम केले होते. तो नंतर पाकिस्तानात परत गेला.
दोघेही राहिलेत गुहेत
IR नुसार, नावेद आणि इतर दहशतवाद्यांना एका शौकत नावाच्‍या ट्रक ड्राइवरने उधमपूर हायवेपर्यंत पोहोचवले. त्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्‍यांनी त्‍यांना घरात आश्रय दिला त्‍या फैयाज आणि जावेद अहमद नावाच्‍या दोन भावांनाही अटक करण्‍यात आली. मात्र, या घरामध्‍ये ते जबरदस्‍ती थांबवले होते की, त्‍यांना फैयाज आणि जावेद यांनी आपल्‍या मर्जीने ठेवले होते, याचा तपास पोलिस करत आहेत. या घरात थांबल्‍यानंतर नावेद आणि नोमान खीरी नावाच्‍या एका ठिकाणी असलेल्‍या गुहेत राहिलेत. त्‍या ठिकाणी त्‍यांना अबू कासिम, दौजाना आणि ताल्हा नावाचे लष्‍काराचे कमांडर भेटले. शिवाय इतर अनेक जण त्‍यांना भेटण्‍यासाठी येत होते.
काकपोरामध्‍ये मिळाले पाच लाख रुपये
खीरी येथून नावेद आणि नोमान पुलवामाच्‍या जवळ असलेल्‍या काकपोरा येथे पोहोचले. त्‍या ठिकाणी त्‍यांना मंत्री आणि तन्ना नावाच्‍या दोन व्‍यक्‍ती भेटल्‍या. त्‍यांनी नावेद आणि नोमानला शस्‍त्रे दिलीत. शिवाय आपल्‍या कारमधून शहरात फि‍रवले. तसेच एका व्‍यावसायिकांनी तन्ना जवळ पाच लाख रुपये दिले होते. काकपोरामध्‍ये एका कुटुंबाने त्‍यांना आश्रय दिला होता. त्‍या कुटुंबालाही अटक करण्‍यात आली.
पाकिस्‍तानातील नावदेच्‍या घरी पोहोचले पत्रकार
नावेदचा पाकिस्‍तानमधील पत्‍ता सापडला असून, त्‍याच्‍या घरापर्यंत मीडिया पोहोचला आहे. पाकिस्तानातील फैसलाबादमधील रफीक कॉलोनीमध्‍ये त्‍याचे घर आहे. दारात मोठ्या संख्‍येने आलेल्‍या पत्रकारांना पाहून नावेदच्‍या कुटुंबियांनी घराबाहेर येणे टाळले. दरम्‍यान, 'नावेदने काय केले?' असा प्रश्‍न शेजा-यांनी पत्रकारांना विचारला.

पाकिस्तानचा खोटारडेपणा झाला उघड
जम्मू-कश्मीरच्‍या उधमपूरमध्‍ये बुधवार पकडेला दहशवादी नावेद हा आपला नागरिक नाही, असे पाकिस्तानने स्‍पष्‍ट केले. पण, नावेदचे वडील मोहम्मद याकूब यांनी एका इंग्रजी वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत स्‍वत:ला 'बदकिस्मत बाप' म्‍हटले आणि तो आपला मुलगा असल्‍याचे मान्‍य केले. त्‍यामुळे पाकिस्‍तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटो...