आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ground Report: 3 हजार किमी सीमा भागांत 10 किमी परिघातील गावे रिकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबच्या भरियाल सेक्टरमधून
एच. एस. चौधरींचा वृत्तांत

सीमेवरील ७ गावांतून एक हजार लोकांना बाहेर काढले


सर्जिकल ऑपरेशननंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली. दीनानगरमध्ये दरिया रावीजवळ स्थित भरियाल सेक्टरमध्ये पाक सीमेवरील लसियान, भरियाल, तूर, चेबे, कजले, झुमर, कुकर, मम्मी चक्क रंगा या गावांत पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी लोकांना सद्य:स्थितीची माहिती दिली. सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे, युद्धासारखी स्थिती आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे लोक पायी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकीने गाव सोडून दरिया रावीच्या मकौडा पट्टणकडे निघाले. तेथे नौका मदतीला होतीच. सामान्य स्थितीत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणारी नौका अंधार झाल्यानंतरही फेऱ्या करत होती. संध्याकाळपर्यंत सुमारे १००० लोकांना या गावांतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. भरियाल सेक्टरमधील सर्व गावे रिकामी झाली आहेत. मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित स्थळी निघाली. आता या गावांत घरातील सामान आणि पशूंच्या देखभालीसाठी एक-दोन पुरुषच आहेत. दरिया रावी पार केल्यानंतरही लोकांना काही किमी पायी जावे लागले. या गावांनी ६५ आणि ७१ चे युद्ध जवळून अनुभवले आहे.

युद्धस्तरावर सुरक्षा उपाय
पंजाबमध्ये सीमाभागांत हाय अलर्ट जारी केला आहे. ५ किमी परिसरातील सर्व गावे रिकामी करून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. सीमेवरील गावांत पोलिस दल वाढवण्यात आले आहे. बीएसएफनेही आघाडी सांभाळली आहे. जवानांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांत इमर्जन्सी वॉर्ड रिकामे केले आहेत. सीमाभागांतील १० किमी परिसरातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. गॅस कंपन्यांनाही आपल्या गोदामांत गरजेपेक्षा जास्त गॅस सिलिंडरचा साठा जमा न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
> २५ किमीपर्यंतच्या गावांतील लोकही युद्धासाठी सज्ज
> शेतकरी म्हणाले, सैनिकांसारखे प्रत्युत्तर देणार
> ५० गावांतील लोकांनी केली सामानाची बांधाबांध
बातम्या आणखी आहेत...