आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, 15 दिवसांनी पाकिस्तानची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चुकून एलओसी पलिकडे गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्या ताब्यात आहे असे कबुली पाकिस्तानने तब्बल 15 दिवसांनी दिली आहे. भारताचे डीजीएमओ रणबीरसिंग आणि पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या चर्चेत ही माहिती समोर आली आहे. चंदू पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने केला होता तर पाकिस्तानने याबाबत कोणत्याही अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता. चंदू एलओसी पार गेल्याचे वृत्त आल्यावर त्याच्या आजीने लगेच जीव सोडला होता.
29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराच्या कमांडोंनी पाकिस्तानच्या भूमिवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यात पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. याच रात्री भारतीय लष्कराचा जवान चंदू चव्हाण चुकून एलओसी पार करत पाकिस्तानी भूमिवर दाखल झाला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्याला अटक केली. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता याची अधिकृत माहिती मिळाल्याने चंदुला सोपविण्यासाठी भारताला प्रयत्न करता येतील.
उद्धव ठाकरे म्हणाले होते- मोदींशी चर्चा करणार
उद्धव ठाकरे काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चंदुला भारतात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
वाचा कोण आहेत चंदू चव्हाण
चंदू चव्हाण हा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा रहिवासी आहे. 2012 मध्ये तो भारतीय लष्करात भरती झाला होता. 22 वर्षीय चंदूने 2 महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्सची सेवाकाळासाठी निवड केली होती. चंदूचा मोठा भाऊ भूषण हा पण मिलिटरीमध्ये आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत चंदू मिलिटरीत दाखल झाला होता.
चंदू बोरविहीर येथील पी. रा. पाटील शाळेचा चंदू चव्हाण माजी विद्यार्थी अाहे. अभ्यासात हुशार तेवढाच जिद्दी असलेल्या चंदूचे लहानपणापासून सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने तयारी करून 2012 मध्ये चंदू सैन्यात दाखल झाला. तो 181 आर्मर रेजिमेंट 37 राष्ट्रीय रायफल गटात कार्यरत आहे.
आजोबांशी झाले अखेरचे बोलणे
दरम्यान 19 सप्टेंबरला चंदूने आजोबा चिंधा पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून शेवटचा संपर्क साधला होता. त्यात सुटी मिळाल्यास 30 सप्टेंबरपर्यंत घरी येईल, असेदेखील त्याने सांगितले होते. तसेच मोठा भाऊ भूषण यांच्याशी उरी हल्ल्यानंतर शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर मात्र परिवाराच्या अन्य सदस्यांशी कोणतेच बोलणे झाले नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, चंदूच्या अाजीवर अंत्यसंस्कार....भाऊही सैन्यात...लहानपणी झाले पोरके...बोरविहीरचे तब्बल 100 तरुण देशसेवेत ....
बातम्या आणखी आहेत...