आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या कुरापती सुरुच, सीमेवरील 7 गावांना केले टार्गेट, डागले तोफगोळे, वडील-मुलीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौशहरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारामुळे स्थानिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. - Divya Marathi
नौशहरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारामुळे स्थानिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. पाकने आज (रविवारी) सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक आर्मीने एलओसीजवळ असलेल्या राजौरी सेक्टरमील चिंगुस भागातील 7 गावांना टार्गेट करत गोळीबार केला. भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, काल (शनिवारी) पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी पुन्हा उफाळून आली आहे. पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भारतीय गावांवर तोफगोळे डागले. या हल्ल्यांत एका वडील- मुलीचा मृत्यू झाला. लष्कराच्या चार जवानांसह सात जण जखमी झाले आहेत.

तणावपूर्ण स्थितीत येथील १२ गावे रिकामी करून घेण्यात आली आहेत. तेथील १५०० पेक्षा जास्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. काही गावांतील लोकांना तर बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. राजौरीमध्ये एलओसीपासून २ किमी परिघातील शाळा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. 

झाकीर मुसाच्या वक्तव्याने हिजबुल मुजाहिदीनमध्ये फूट
श्रीनगर- अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिदीन व अतिरेकी कमांडर झाकीर मुसा यांच्यात वादाची ठिणगी पडली. मुसाच्या हुरियत नेत्यांविरुद्धच्या वक्तव्यांनंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. हिजबुलने मुसाच्या वक्तव्याबाबत जबाबदारी झटकली तर मुसानेही हिजबुलशी संबंध तोडले आहेत. 

गस्ती पथकावर हल्ला
पुलवामापासून सुमारे ३५ किमी अंतरावर सीर और त्रालमध्ये अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तीन दिवसांत पाकने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या घटनांत आतापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा मार्चपर्यंत पाकने ८८ वेळेस सीमेवर गोळीबार केला आहे.

तोयबाचे मॉड्यूल उद्ध्वस्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी अतिरेकी संघटना लष्कर-ए-ताेयबाचे मॉड्यूल उद््ध्वस्त केले आहे. याप्रकरणी एका माजी विशेष पोलिस अधिकाऱ्यासह सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...