आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, एलओसी ट्रेड सेंटरवर हल्ला, पूंछ-रावळकोट बससेवा रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रीसंधीचे उल्लंघन होत असून पंूछ जिल्ह्यात पाक सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला.  या परिसरातील सहा चौक्यांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. सीमेवरील ट्रेड सेंटर, चक्का दा बागवर आज हल्ला करण्यात आला आहे. गाेळीबाराची  ताजी घटना पाहता पूंछ-रावळकोट बससेवा सोमवारी रद्द करण्यात आली. तसेच शाळांना सुटी देण्यात आली. भारतीय जवानांनी या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर दिले.  

पाकिस्तानकडून सोमवारी पूंछमधील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आणि गोळीबार सुरू झाला.  खडी, करमारा, गुलपूर, दिगवार, नैदिला, बिगला, माटी, दलान आदी भागांत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. आधुनिक शस्त्रांसह तोफांचाही मारा करण्यात आला होता. दिवसभर चालू असलेल्या गोळीबारास भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार होत असल्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. या गोळीबारानंतर बससेवा रद्द करण्यात आल्या. ज्या भागात गोळीबार सुरू होता तेथील बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पूंछ जिल्ह्यात काही दिवसांपासून पाककडून गोळीबार सुरू आहे. बंदोबस्त वाढवण्यात आला. 

माजी सरपंचाचे अपहरण व खून  
श्रीनगर-
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका माजी सरपंचाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्याच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हा सरपंच नॅशनल कॉन्फरन्सशी संबंधित असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहशतवाद्याचे एक दल माजी सरपंच फियाय अहमद याच्या घरात शिरले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी सरपंचास घरातून उचलून नेले. दहशतवादी निघून गेल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध सुरू केला असता त्यांचा मृतदेहच जंगलापासून थोड्या दूर अंतरावर हाती लागला. काश्मीरमध्ये पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही पहिली हत्या आहे. पंचायत निवडणुकापासून दूर राहण्याची धमकी सरपंचास देण्यात आली होती.  
 
महामार्ग सातव्या दिवशीही बंद  
जम्मू-
काही दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बनिहाल, रामबन आणि पंथालजवळ झालेल्या भूस्खलनामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालेला होता. राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी सातव्या दिवशीही बंद राहिल्याने देशाचा या भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे जम्मू बसस्थानकावर आणि इतर भागांत अडकून पडलेले प्रवासी अडचणीचा सामना करत आहेत. राष्ट्रीय राजमार्ग लवकर सुरू न झाल्यास प्रवाशांना हवाईमार्गे श्रीनगरला सोडण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले .

उमर अब्दुल्ला यांच्या ताफ्यावर हल्ला
श्रीनगर-
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या ताफ्यावरच हल्ला चढवला. त्यांची सुरक्षेसाठी वापरात असलेली जॅमर व्हॅनची तोडफोड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्या दोन माजी मंत्र्यांसह बीरवाह येथे दौऱ्यावर होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना हुसकावून लावले. त्यानंतर अब्दुल्लांचा ताफा रवाना झाला.
बातम्या आणखी आहेत...