आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Both Export In 40 Years, No Political Issue

पाकला ४० वर्षांत निर्यात सर्वाधिक, राजकीय तणावाचा परिणाम नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटारी सीमा (अमृतसर)- जम्मूला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सतत चालू आहे. मात्र, राजकीय तणावाचा परिणाम दोन्ही देशांतील व्यवसायावर झाला नाही. गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानला जवळपास दोन अब्ज डॉलर निर्यात केली. गेल्या दशकातील हा सर्वाधिक आकडा आहे.

इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनच्या अहवालानुसार भारताने गेल्या आर्थिक वर्षात २०१३-१४ मध्ये पाकिस्तानला २.०४ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. याआधी २०११-१२ मध्ये १.५ अब्ज डॉलर आणि २०१२-१३ मध्ये १.८१ डॉलर होती. याशिवाय पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या आयातीत घट झाली आहे.

पाकिस्तानच्या विदेश व्यापाराच्या आकडेवारीनुसार देशाने गेल्या आर्थिक वर्षात ४०.७ लाख डॉलरची निर्यात केली. हा आकडा २०१२-२०१३ मध्ये ३२.७ कोटी तसेच २०११-१२ मध्ये ३३.८ कोटी डॉलर होते.
> इंडियन कौन्सिलच्या अहवालानुसार, दोन्ही देशांत १९ अब्ज डॉलरपर्यंत व्यापार करण्याची क्षमता आहे.
...तर १८०० वस्तूंची विक्री
किराणा व ड्रायफ्रूट कमर्शियल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मेहरा यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये आपल्या भाज्या, चहा, सोयाबीन, कॉटन, हँडिक्राफ्ट आणि टेक्स्टाइल आदींची मागणी वाढली आहे. भारतात पाकिस्तानचे सिमेंट, जिप्सम आणि ड्रायफ्रूट येते. असे असले तरी दोन्ही देशांतील व्यापार केवळ १३७ वस्तूंशी संबंधित आहे. पाकिस्तानने संपूर्ण सहकार्य केल्यास भारत त्यांच्या बाजारपेठेत कमीत कमी १८,००० वस्तू विकू शकतो.