आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाककडून शांतता भंग, तीन वेळा गाेळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानने सोमवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तीनदा गोळीबार केला. पुंछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर दोन वेळेस तसेच कठुआच्या हिरानगर सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला.
पुंछ जिल्ह्याच्या बालाकोट तसेच कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री १२.०० वाजता आधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार करण्यात आला. भारतीय चौक्यांना निशाणा साधत साधारण अर्धा तास गोळीबार झाला. यानंतर सकाळी ६.०० वाजता अन्य ठिकाणच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल लष्करानेही कारवाई केली. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरच्या चौक्यांवर निशाणा साधत गोळीबार करण्यात आला.
बोबिया चौकीवर तैनात बीएसएफ जवान ए. के. राभाच्या दोन्ही पायात गोळ्या घुसल्या. उपचारासाठी त्याला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. बीएसएफने या परिसरात जवानांची संख्या वाढवली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने अशा कुरापती सुरू असतात.
यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच गोळीबार
पाकिस्तानकडून वर्षाच्या सुरुवातीपासून सतत गोळीबार आणि घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. जानेवारीत केलेल्या गोळीबारात आयबीवर वसलेली गावे रिकामे करावी लागली होती. या महिन्यांत १२ वेळा गोळीबार झाला आहे. यामध्ये बीएसएफचे दोन जवान, दोन लष्कराचे जवान तसेच दोन महिलांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये सहा वेळा गोळीबार झाला होेेता. मार्च,एप्रिल आणि मेमध्ये दोन वेळेस गोळीबार आणि घुसखोरीचे प्रयत्न झाले. लष्कराने घुसखोरी अयशस्वी ठरवली.