आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात 2 मुले ठार; घुसखाेरी करणाऱ्या तीन अतिरेक्यांना टिपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराने सोमवारी नियंत्रण रेषेवर घुसखाेरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. कारवाईत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. दुसरीकडे, पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने सोमवारी गोळीबार केला. यात २ अल्पवयीनांचा बळी गेला असून ११ नागरिक जखमी झाले. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत पाकच्या दोन चौक्या उद्््ध्वस्त केल्या. 

पूंछ जिल्ह्याच्या कसबा व केरनी गावात गोळीबार झाला. यात असरार अहमद (९) आणि यास्मिन अख्तर (१५)  या मुलीचा मृत्यू झाला. ११ नागरिक जखमी झाले. दोन गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने जम्मूला हलवण्यात आले. इतर जखमींना जम्मू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, बारामुल्लामध्ये नियंत्रण रेषेजवळ तैनात जवानांना रामपूर सेक्टरमध्ये घुसखाेरीची माहिती मिळाली. जवानांनी अतिरेक्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले. तथापि, त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. दुसरीकडे, तंगधर सेक्टरमध्येही एका अतिरेक्याला टिपले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...