आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव यांच्या आईच्या व्हिसा अर्जावर विचार सुरू : पाकची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले  भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका यांच्या व्हिसा अर्जावर आम्ही विचार करत आहोत, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. मुलाची भेट घेण्यासाठी अवंतिका जाधव यांना परवानगी द्यावी, अशी विनंती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांना केली होती.
 
मात्र, अजीज यांनी त्या विनंतीपत्राला पोहोच देण्याची साधी तसदीही घेतली नाही, अशी खंत स्वराज यांनी दोन दिवसांआधी व्यक्त केली होती. त्या पृष्ठभूमीवर पाकिस्तानने ही माहिती दिली. मात्र, अजीज यांच्याकडे केलेली शिफारशीची मागणी ‘राजनैतिक सिद्धांता’च्या विरोधात आहे, अशी टिप्पणीही पाकिस्तानने केली आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...