आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे हल्ले सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - दोन दिवसांच्या शांततेनंतर सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी रात्री पाकिस्तानने आरएसपुरा व अरनिया सेक्टरमधील १५ भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. अनेक गावांनाही लक्ष्य केले. जबोवाल गावात दोन भावांसह तिघे जखमी झाले. अरनिया सेक्टरमध्ये बीएसएफच्या तीन चौक्यांवर गोळीबार झाला. तथापि, सांबा, रामगड, हीरानगर व कठुआत गोळीबाराची माहिती नाही.

भारताविरुद्ध पाकिस्तानची युनाेकडे तक्रार
इस्लामाबाद | पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे भारताची तक्रार केली आहे. पाक पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना लिहिलेल्या पत्रात भारत आठवडाभरापासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, अशी तक्रार केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही पाकने केली आहे.