आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSF चे चोख प्रत्युत्तर, पाकच्या 45 चौक्या उद्ध्वस्त, भारताचे 7000 नागरिक मदत शिबिरांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : पाकिस्तानच्या सियालकोटमधील धमाला गावात भारतीय फायरिंगनंतर एका घराची अशी अवस्था झाली होती.
नवी दिल्ली/जम्मू - पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरच्या सीमेवरील नियंत्रण रेषेवर गोळीबाराचे सत्र सुरुच आहे. बुधवारी रात्रभर भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानच्या सुमारे 45 चौक्या उध्वस्त करण्यात आल्या.
कठुआ, सांबा, काना चंक आणि अखनूर सेक्टरमध्ये अजूनही फायरिंग सुरुच आहे. बीएसएफच्या 50 ते 60 चौक्यांवरही फायरिंग करण्यात आली. सीमेला लागून असलेल्या परिसरात झालेल्या गोळीबारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 85 जखमी आहेत. दरम्यान, 7000 नागरिकांना मदत शिबिरांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अखनूर सेक्टरमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सीमेवर सुमारे गेल्या आठ दिवसांपासून सलग गोळीबार सुरू आहे. त्यामुळे भारतानेही कडक भूमिका घेत जशास तसे उत्तर दिले आहे. सीमेपलिकडून फायरिंग बंद होईपर्यंत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगत भारताने तोपर्यंत चर्चाही करणार नसल्याचे सांगितले आहे.

सैन्य प्रमुख म्हणाले, परिस्थिती गंभीर, पण चोख प्रत्युत्तर देणार
बुधवारी भूदल आणि नौदला प्रमुखांनी सीमेवरील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचेही स्पष्ट केले. नौदल प्रमुख प्रमुख अरूप राहा म्हणाले की, सीमेवर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला युद्ध नको आहे. पण आमच्यावर होणा-या प्रत्येक हल्ल्याचा उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भूदल प्रमुख दलबीर सिंह सुहाग म्हणाले की, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्करप्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याबरोबर चर्चा केली. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्यूत्तर देण्याच्या सूचना यावेळी लष्कराला देण्यात आल्या. फायरिंग पाकिस्ताने सुरू केली आहे. तर बंदही त्यांनीच करावी असे स्पष्ट करण्यात आले.

पाक नवी रणनीती आखणार
दरम्यान नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याने पाकिस्तान आता नवी रणनीती आखण्याच्या विचारात आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. तसेच पाकिस्तानने वत्त वाहिन्यांना सीमेवरील गोळीबाराच्या बातम्या प्रसारीत करू नये अशे निर्देश दिले आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 50 हून अधिक चौक्यांवर फायरिंग केले आहे. गुप्तचर संस्थांच्या मते सीमेपलिकडेही 15 हून अधिक लोक ठार झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्सशिवाय तेथील लष्करही कारवाईत साथ देत आहे.
पुढे वाचा, सीमेवरील परिस्थितीबाबत मोदींवर टीका