आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर मुद्दा आपसांत चर्चा करून सोडवा, आम्ही दखल देणार नाही; UN ने पाकला ठणकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात असलेले भारतीय जवान
नवी दिल्ली/जम्मू - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. पाकने संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा मुद्दा मांडला होता. पण या मुद्यामध्ये दखल देणार नसून आपसांत चर्चा करून हा मुद्दा सोडवावा असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे चर्चेसाठी
पुढाकार पाकने घ्यावा असेही संयुक्त राष्ट्रांनी सुनावले आहे.
पाकिस्तानच्या एका पाठोपाठ एक खोड्या सुरुच आहेत. एकिकडे सीमेवर भारताच्या विविध भागांत फायरिंग सुरुच आहे. त्याचवेळी काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरुच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोमवारी अमेरिकेच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाच्या भेटीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. शरीफ यांनी सिनेटर टीम केन आणि अँगस किंग यांची भेट घेतली. चर्चा हाच या मुद्याचा तो़डगा असल्याचे शरीफ या दोघांना म्हणाले.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'नवाज शरीफ यांनी दोन्ही सिनेटरला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव हाच काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अशा प्रयत्नात काश्मीरच्या लोकांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.' यादरम्यान, पाकिस्तानने सीमेवर पुंछच्या विविध भागांमध्ये असलेल्या चौक्यांवर फायरिंग करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. केरनी, शाहपूर आणि साब्जियामध्ये थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरुच आहे. यात एक महिला जखमी झाली आहे.

भारतीय लष्करही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहे. रविवारी सकाळपर्यंत म्हणजे सुमारे 24 तास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून फायरिंग बंद होती. शनिवारी पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये फायरिंग केली होती. त्यात एक जण जखमी झाला होता. 1 ऑक्टोबरपासून पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यात 8 जण ठार झाले आहेत, तर 90 जण जखमी आहेत. फायरिंगमुळे सीमेवरील गावांत राहणा-या सुमारे 32000
नागरिकांना घर सोडावे लागले आहे.

24 तास शांत होत्या बंदुका
त्यापूर्वी पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर 24 तास बंदुका शांत होत्या. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाचा एकही प्रकार घडला नाही. मात्र दोन दिवस शांत राहिल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोर्टार हल्ले केले. तसेच फायरिंगही केले. त्यात 12 घरांचे मोठे नुकसान झाले.

पुढे वाचा, सुरक्षादलांवर दहशतवाद्यानी केला हल्ला, एक जवान शहीद