आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धात पाकिस्तानने या शहरावर टाकले होते 150 बॉम्ब, पण एकही जीवितहानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकाशाने लख्ख जोधपूर - Divya Marathi
प्रकाशाने लख्ख जोधपूर
जोधपूर - 6 सप्टेंबर 1965 ला सुरू झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या 2 दिवसांनंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने जोधपूरवर  रात्री जोरदार हल्ले सुरू केले. जोधपूरचे नामो-निशाण मिटवण्यासाठी पाकिस्तानने सलग 2 रात्र जबरदस्त बॉम्ब वर्षाव केला होता. पाकिस्तानने त्यावेळी 150 बॉम्ब टाकले होते असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, पाकिस्तानने हे सर्व बॉम्ब नागरी वस्त्यांवर टाकले असतानाही एकही जीवितहानी नाही.
 

जीवितनाहीच नाही
- शहरातील जुने लोक 1965 मध्ये पाकिस्तानने केलेली बॉम्बिंग आजही विसरलेले नाहीत. जयपूरच्या आसामानावर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी ताबा मिळवला होता. 
- पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सलग 2 रात्री बॉम्बिंग केली होती. शहरावर एकूणच 150 बॉम्ब टाकण्यात आले होते. यापैकी काही बॉम्ब हवाई तळावर पडले, यात काही प्रमाणात नुरकसान देखील झाले. 
- एक बॉम्ब जोधपूर कारागृह परिसरात पडला होता. यात आठ कैदी जखमी झाले. या व्यतीरिक्त सर्वच बॉम्ब शहरावर टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे, शहरावर बॉम्ब पडले पण, एकही बॉम्ब फुटला नाही. 
- पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय जवानांनी जोधपूर एयरबेस पुन्हा दुरुस्त करून लढाऊ विमान उडवले होते. तसेच पाकिस्तानात घुसून जोरदार हवाई हल्ले केले.
 
 
जोधपूरमध्येच ट्रेन झाले होते पाकिस्तानी
- जोधपूर एयरबेस देशातील सर्वात जुन्या एयरबेसपैकी एक आहे. जोधपूरमध्ये वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात होते. स्वातंत्र्यापूर्वी देशातील सगळ्याच वैमानिकांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. 
- पाकिस्तानच्या निर्मितीनंतर एयरफोर्सचे दोन तुकडे झाले. पाकिस्तान एयरफोर्सच्या वैमानिकांपैकी बहुतांश वैमानिकांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. 
- हल्ला करणाऱ्या पायलट्सला शहरातील प्रत्येक काना-कोपरा पाठ होता. त्यामुळेच, ते शहरावर जोरदार हल्ला करू शकले. तरीही, भारतीय लष्कराने दारुगोळा कुठे ठेवला हे त्यांना माहिती नव्हते. 
- जबरदस्त बॉम्बिंग केल्यानंतर आपण पूर्ण शहर उद्ध्वस्त केल्याचे त्यांना वाटत होते. मात्र, हे शहर पुन्हा आधीसारखाच उभा आहे. पाकिस्तानी पायलट्सचा एकही निशाणा व्यवस्थित लागला नाही. त्यांची बहुतांश बॉम्ब निर्जन आणि वाळवंटी भागावर जाऊन पडले होते.
 

चामुंडा देवीने संरक्षण केल्याची आस्था
पाकिस्तानने दीडशे बॉम्बगोळे टाकून सुद्धा एकही जीवितहानी झाली नाही. ही सगळीच चामुंडा देवीची कृपा असल्याची स्थानिकांची आस्था आहे. इतिहासतज्ञ मोहनलाल गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, युद्ध सुरू होण्यापूर्वी येथील स्थानिकांनी आई चामुंडेच्या हातांचे मेहंदीचे ठसे घरा-घरांवर लावले होते. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर जीवितहानी न झाल्याने लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, शहराचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...