आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा ३ भारतीय चौक्यांवर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, शनिवारी सकाळी तीन भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी १०.४० च्या सुमारास जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागातील सीमा चौक्यांवर लहान शस्त्रास्त्रे आणि उखळी तोफांनी मारा केला. बीएसएफनेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे एक तास म्हणजे सकाळी ११.४० वाजेपर्यंत सुरू होती. पाकिस्तानी गोळीबारात जीवितहानी झाली नाही तसेच कोणी जखमीही झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...